Deepika Padukone And Ranveer Singh Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone Baby Bump : मतदानाला गेलेल्या दीपिकाचा पहिल्यांदाच दिसला बेबी बंप, रणवीर सिंगने गर्दीत घेतली पत्नीची विशेष काळजी

Deepika Padukone And Ranveer Singh News : सध्या सोशल मीडियावर रणवीर आणि दीपिकाचा एक क्यूट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रणवीर दीपिकाची कठीण काळातही कशी साथ देतोय हे पाहायला मिळत आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडचं क्यूट कपल रणवीर आणि दीपिका सध्या कमालीचे चर्चेत आहे. सध्या दीपिका प्रग्नेंट असून सप्टेंबर २०२४ मध्ये ती बाळाला जन्म देणार आहे. नुकतंच महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडला. यावेळी दीपिकानेही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दीपिकासोबत अभिनेता रणवीर सिंह सुद्धा तिच्यासोबत होता. दीपिकासोबत अभिनेता रणवीर सिंह सुद्धा तिच्यासोबत होता. सध्या सोशल मीडियावर रणवीर आणि दीपिकाचा एक क्यूट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रणवीर दीपिकाची कठीण काळातही कशी साथ देतोय हे पाहायला मिळत आहे.

काल रणवीर आणि दीपिका दोघांनीही मुंबईत मतदान केलं, दोघेही कारने मतदान केंद्रावर पोहोचले. दीपिका मतदानाला पोहोचल्यानंतर अनेकांच्या नजरा तिच्या बेबी बंपवर गेल्या.

मतदाना दरम्यानचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी दीपिकाने व्हाईट कलरचा लूज शर्ट आणि डेनिम जीन्स तर रणवीरनेही व्हाईट शर्ट आणि डेनिम जीन्स वेअर केलेला होते.

आपलं आवडतं क्यूट कपल मतदानासाठी पोहोचलंय म्हणटल्यावर चाहत्यांची गर्दी तर होणारच. या गर्दीतून वाट काढत रणवीरने दीपिकाला आपल्या कारपर्यंत पोहोचवल्यामुळे त्याच्यावर कौतुक होत आहे.

खरंतर, रणवीर- दीपिका हे बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहे. हे कपल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. विरल भयानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरने दिपीका रणवीरचा हा क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. रणवीर सिंगचा हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. ट्रोलर्सनेही रणवीर सिंगचे प्रचंड कौतुक केले आहे. सोबतच यूजर्सने व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव करीत आहे. एका यूजरने रणवीर सिंगला 'बेस्ट पती' म्हणत टॅग केले आहे. यावेळी ट्रोलर्सनेही रणवीर सिंगचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर, महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT