Deepika Padukone and  Ranveer Singh Image
Deepika Padukone and Ranveer Singh Image  Saam Tv
मनोरंजन बातम्या

बॉलिवूडचा 'एनर्जेटिक मॅन' रणवीरला शिकायचीय कोकणी भाषा, कारण ऐकून चकित व्हाल!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडचा सर्वात एनर्जेटिक अभिनेता म्हटलं की, रणवीर सिंह(Ranveer Singh) याचं नाव आधी घेतलं जातं. याच 'एनर्जेटिक मॅन'ला आता कोकणी भाषा शिकायची आहे. आश्चर्य वाटलं असेलच. पण हे खरंय. रणवीरला कोकणी भाषा का शिकायची आहे, यामागचं कारण ऐकूनही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

सध्या अभिनेत्री दीपिका पदुकोण(Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह आपल्या संपूर्ण कुटुंबासह अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. याच दरम्यान दीपिका आणि रणवीर हे दोघे गायक शंकर महादेवनच्या कॉन्सर्टमध्ये नाचताना देखील दिसून आले. अमेरिकेतील सॅन जोस मध्ये कोकणी संमेलनाच्या १०व्या पर्वात अभिनेत्री दीपिकाला चीफ गेस्ट म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी दीपिका मंचावर आपलं म्हणणं मांडत असतानाच, रणवीर सिंह सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाला. त्यावेळी त्याने कोकणी भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली. यामागचं जे कारण रणवीरने सांगितलं, ते ऐकून हसून हसून लोटपोट व्हाल.

दीपिकासोबत मंचावर गेलेल्या रणवीरने सांगितले की, मला आता कोकणी भाषा समजते आणि त्याचं कारणही मी तुम्हाला येथे सांगतो. भविष्यात आमची मुले होतील तर त्यांची आई माझ्याबाबतीत त्यांना कोकणी भाषेत सांगेल. रणवीरने जे कारण सांगितले ते ऐकून तेथे उपस्थित सर्व जणांमध्ये एकच हशा पिकला.

रणवीरने ही बाब सांगितल्यानंतर दीपिकानंही रणवीरबाबत सांगितलं. एकदा रणवीरने मला सांगितलं की, मला कोकणी शिकायची आहे. त्यावेळी ही किती चांगली गोष्ट आहे, असं मला त्यावेळी वाटलं.

सिलिकॉन व्हॅलीच्या केंद्रात आयोजित तीन दिवसांच्या इव्हेंटमध्ये प्रदर्शन, संगीत मेजवानी, सेमिनार, फूड, कोकणी संस्कृती आदी कार्यक्रम झाले. या संमेलनाला दीपिकासह तिचे कुटुंब म्हणजेच वडील प्रकाश पदुकोण, उजाला पदुकोण, बहीण अनिषा पदुकोण आदी उपस्थित होते. या इव्हेंटची सुरुवात शंकर महादेवनच्या सादरीकरणाने झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

Today's Marathi News Live: पुणे सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळलं; वाहनांचं मोठं नुकसान

Team India Head Coach : गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?; २ संकेत अन् जोरदार चर्चा

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

SCROLL FOR NEXT