athiya shetty trolled for using Lata Mangeshkar ji image instead of Asha Bhosle for tribute  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Trolled: आशा भोसले यांचं निधन, पण आदरांजली लता मंगेशकरांना; प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीकडून मोठी चूक

Actress Trolled: आशा भोसले यांना आदरांजली वाहताना लता मंगेशकरांचा फोटो पोस्ट केल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आले. तिने चुकून लता मंगेशकर यांचा फोटो पोस्ट केल्यामुळे चाहते संतापले आहेत.

Shruti Vilas Kadam

Actress Trolled: दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरली आहे. शाहरुख खानपासून ते सोनू निगमपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी 'आशाताई' यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मात्र, या सर्व श्रद्धांजलींच्या गर्दीत, अभिनेत्री अथिया शेट्टीची इन्स्टाग्राम स्टोरी सर्वाधिक व्हायरल झाली आहे.

घडले असे की, सुनील शेट्टीची मुलगी अथियाने आशाताईंना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक इन्स्टा स्टोरी शेअर केली होती. परंतु, अनावधानाने तिने आशाजींच्या ऐवजी लतादीदींचा फोटो पोस्ट केला.

चाहत्यांनी अथियाची चूक हेरली

साहजिकच, इतकी मोठी चूक चाहत्यांच्या नजरेतून सुटणे कठीणच होते. नेटकऱ्यांनी तिच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आणि तिला आठवण करून दिली की, लातादीदींचे निधन ६ फेब्रुवारी २०२२ रोजी झाले होते. त्यानंतर काही वेळातच, अथियाला आपली चूक उमजली आणि तिने ती पोस्ट डिलीट केली. मात्र, तोपर्यंत सोशल मीडिया नेटकऱ्यांनी ती चूक हेरली होती आणि त्या पोस्टचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वेगाने व्हायरल करायला सुरुवात केली.

नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केले

अनेक नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करताना हा प्रश्न उपस्थित केला की, वडील सुनील शेट्टींच्या एका चांगल्या बॉलिवूड कुटुंबातील व्यक्तीकडून इतकी मोठी चूक कशी होऊ शकते? एका नेटकऱ्याने कमेंट केली हे लज्जास्पद" आहे. तर एकाने तीला "सौंदर्य आहे, पण बुद्धी नाही" असा टोमणा मारला.

athiya shetty trolled for using Lata Mangeshkar ji image instead of Asha Bhosle for tribute

'X' (पूर्वीचे ट्विटर) वरील एका नेटकऱ्याने लिहिले, "अथियाने दिवंगत आशा भोसले यांच्याऐवजी दिवंगत लता मंगेशकर यांचा फोटो असलेली स्टोरी पोस्ट केली. 'नेपो किड्स' (Nepo kids) कोणत्याही मार्गाने कोणतीही मेहनत न घेता प्रसिद्धी मिळाल्याचे हे परिणाम आहेत. दुसऱ्या एका नेटकऱ्याने कमेंट केली, "खरोखरच निराशाजनक आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाना पटोलेंवर नोटांचा वर्षाव; व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल, video

ट्रेनमधून किती वजनाचं लगेज घेऊन जाऊ शकतो? 1A, 2A, 3A आणि SL डब्यांसाठी नियम काय?

टी२० क्रिकेट संघात निवड न झाल्यानं नैराश्याने गाठलं; क्रिकेटरनं आयुष्य संपवलं

Maharashtra News Live Update: मिसिंगलिंकच्या केबल पुलावर थांबून फोटो, सेल्फी काढणाऱ्या प्रवाशांवर कारवाई

Kolhapur Tourism : मराठा सामर्थ्याचे प्रतीक! शिवकालीन वारसा जपणारे कोल्हापूरमधील ५ किल्ले

SCROLL FOR NEXT