Ankita- Vicky Home Tour Video Instagram
मनोरंजन बातम्या

Ankita- Vicky Home Tour Video: विकी-अंकिताचं आहे कोट्यवधीचं आलिशान घर; ‘तहलका’ने दाखवली घराची झलक

Ankita- Vicky Home Video: तहलकाने युट्यूब चॅनलवर अंकिता-विकीच्या आलिशान घराची झलक शेअर केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

Chetan Bodke

Ankita- Vicky Home Tour Video

'बिग बॉस १७' फेम अंकिता लोखंडे आणि विकी जैन सध्या प्रचंड चर्चेत आहे. हे दोन्ही कपल 'बिग बॉस १७'च्या घरातून बाहेर येताच चांगलेच चर्चेत आले आहे. सध्या ह्या कपलच्या घराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

'बिग बॉस १७' शो संपल्यानंतर अंकिताने आणि विकीने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना घरी आमंत्रित केलं होतं. यावेळी प्रसिद्ध युट्यूबर सनी आर्या उर्फ तहलका सुद्धा उपस्थित होता. तहलकाने त्याच्या युट्यूब चॅनलवर अंकिता-विकीच्या आलिशान घराची झलक शेअर केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

'बिग बॉस 17'च्या घरात विकी आणि अंकिता दोघेही एकत्रित स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. विकी ग्रँड फिनालेच्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच तर अंकिता लोखंडे टॉप ४ म्हणून बाहेर आली. अंकिता लोखंडेला 'बिग बॉस 17'चं विजेतेपद न मिळाल्यामुळे ती प्रचंड नाराज असल्याचे दिसून आले होते. शो संपल्यानंतर अंकिताने आणि विकीने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना घरी आमंत्रित केलं होतं. तहलकाने विकी आणि अंकिताच्या अलिशान घराची थेट मुकेश अंबानींच्या बंगल्याशीच तुलना केली आहे. हा व्हिडीओ अंकिता लोखंडेच्या एका फॅनपेजने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना तहलका म्हणतो, "आता थोडं पाहून घ्या, मुंबईमध्ये इतकं मोठं घर अंबानींनंतर फक्त विकी भैय्याचंच आहे. मित्रांनो, विकी भैय्याचं हे घर कोट्यवधींचं आहे. कितीही चालत गेलात तरी हे घर संपत नाही. घरात टॉप क्लास सुविधा आहेत.", असं तो या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतो. तहलकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, घरातील होम थिएटर आणि स्विमिंग पूलसह घरातील इतर गोष्टीही तिने दाखवल्या आहेत. अंकिता- विकीच्या या घराची किंमत तब्बल १०० कोटी रुपये असल्याचं कळतंय.

विकीने २०१९ मध्ये हे घर खरेदी केलं होतं. अंकिताचं आणि विकीचं २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. 'बिग बॉस १७' मधून दोघांनी चांगलीच कमाई केली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये असताना विकी आणि अंकिताने एका एपिसोडसाठी तगडं मानधन आकारलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT