Kangana Ranaut Gifts House In Chandigarh To cousin Varun Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut House Gift : बहीण असावी तर कंगनासारखी, चुलत भावाला लग्नात दिलं खास गिफ्ट; पाहा PHOTO

Kangana Ranaut Gifts House In Chandigarh To cousin Varun : कंगनाच्या चुलत भावाचा लग्नसोहळा पार पडला. भाऊ वरूणला कंगनाने चंदिगढमध्ये अलिशान घर गिफ्ट केलेलं आहे.

Chetan Bodke

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभेची खासदार बनल्यापासून अभिनेत्री कंगना रणौत कमालीची चर्चेत आली आहे. मध्यंतरी एका वेगळ्या कारणामुळेही अभिनेत्री चर्चेत होती. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर सध्या कंगना आपल्या कुटुंबासोबत फावला वेळ घालवताना दिसत आहे. नुकताच कंगनाच्या चुलत भावाचा लग्नसोहळा पार पडला. भाऊ वरूणला कंगनाने चंदिगढमध्ये अलिशान घर गिफ्ट केलेलं आहे. याबद्दलची माहिती स्वत: वरूणने इन्स्टा स्टोरी शेअर करत दिली आहे. त्यासोबतच त्याने चाहत्यांचे आभारही मानले.

नुकतंच कंगनाचा चुलत भाऊ वरुण रणौतचा लग्नसोहळा पार पडला. या खास प्रसंगी कंगनाने खास भावाला भेट म्हणून चंदिगडमध्ये घर गिफ्ट दिलं आहे. याची माहिती त्याने स्वत: काही घराचे फोटो शेअर करत माहिती दिली आहे.वरुण रणौतचं नुकतंच सीमाशी लग्न झालं. या खास प्रसंगी सर्व रणौत कुटुंबीय एकत्र जमले होते. यावेळी सर्वांनी कंगनाने वरुण- सीमाला दिलेल्या घरातच वेळ घालवला. वरुणने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सर्वांच्या चेहेऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत आहे.

कंगनाने इन्स्टा स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील पहिल्या फोटोत वरुणने सुंदर मेसेज लिहिला आहे. ‘या अनमोल भेटीबद्दल कंगना दीदी धन्यवाद… आता चंदीगढमध्ये घर आहे.’ असं त्याने लिहिलं होतं. यानंतर कंगनाने या नव्या घरातील काही फोटो शेअर केलेले आहेत. कंगनाच्या भावाचे घर रंगीबेरंगी फुलांनी सजवलेले दिसत आहे. मरून रंगाचा सोफा आणि व्हाईट राऊंड टेबल आहे. असे अनेक वेगवेगळ्या वस्तू त्याच्या घरात पाहायला मिळत आहेत. कंगनाने आणि तिच्या चुलत बहिणीने वरूण आणि अंजलीला घर गिफ्ट केलेलं आहे. दरम्यान, या घराची किंमत कळू शकलेली नाही.

Kanagana Ranaut Brother Post

कंगना रणौत यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, लवकरच तिने स्वतः दिग्दर्शन केलेल्या ‘इमर्जन्सी’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटात कंगना रणौतने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत कंगना व्यतिरिक्त अनुपम खेर, श्रेयस तळपदे, विशाल नायर आणि महिमा चौधरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Bhurka Recipe: जेवताना तोंडी लावायला बनवा झणझणीत लसणाचा भुरका

Maharashtra Live News Update फलटण आत्महत्या प्रकरणात फडणवीसांचे SIT गठित करण्याचे आदेश

Maharashtra Politics: शिवसेना उद्धव ठाकरेंची तर राष्ट्रवादी शरद पवारांचीच; मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

PM Narendra Modi : आजारातून लवकर बरे व्हा; संजय राऊतांची प्रकृती गंभीर, PM नरेंद्र मोदींकडून खास पोस्ट

French fries Recipe : घरीच बनवा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत फ्रेंच फ्राइज, एक घास खाताच महागड्या हॉटेलची चव विसराल

SCROLL FOR NEXT