Ameesha Patel Talk About On Gadar 2 Instagram
मनोरंजन बातम्या

Ameesha Patel On Gadar 2: गदर २ सुपरहिट, मात्र अमिषाला चित्रपटातल्या ‘या’ गोष्टी खटकल्या; मुलाखतीत म्हणाली...

Ameesha Patel Interview: चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच सध्या अमिषा पटेलने मुलाखतीत चित्रपटाबद्दल महत्वाचे खुलासे केले आहेत.

Chetan Bodke

Ameesha Patel Talk About On Gadar 2

सनी देओल आणि अमिषा पटेल अभिनित ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश संपादन केले आहे. ११ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होताच अवघ्या काही दिवसातच या चित्रपटाने देशभरात कोट्यवधींची कमाई केली. तब्बल २१ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर सकीना आणि तारा सिंगची लव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांना ‘गदर २’च्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहता येणार आहे. या चित्रपटाने फक्त एका आठवड्यातच अनेक रेकॉर्ड्स मोडित काढले आहे.

नुकतंच चित्रपटाने ३०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केली आहे. चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच सध्या अमिषा पटेलची मुलाखत सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली आहे. तिने त्या मुलाखतीत चित्रपटाबद्दल महत्वाचे खुलासे केले आहेत.

अमिषा पटेलने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने चित्रपटाबद्दल अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. यावेळी अभिनेत्रीला मुलाखतीत विचारण्यात आले की, तिला गदर २ मध्ये काय बदलायला आवडेल? या प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तराची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे.

अमिषा पटेल म्हणते, “माझी इच्छा आहे, मी एडिटर व्हावं. जर मी एडिटर असते तर अनेक गोष्टी काढल्या असत्या आणि काही गोष्टी पुन्हा एडिट केल्या असत्या. जर असं काहीसं झालं असतं तर, चित्रपट खूपच चांगला झाला असता.” (Actress)

अमिषा पटेल, सनी देओल, उत्कर्ष शर्मा चित्रपटात मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. अनिल शर्मांचा मुलगा उत्कर्ष शर्मा असून त्याच्या अभिनयाचीही सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. (Actor)

सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटाने थिएटरमध्ये पहिल्या दिवशी 40 कोटींची ओपनिंग केली होती. चित्रपटाने ८ दिवसांत तब्बल ३०४ कोटींची कमाई केली आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाने केजीएफचा रेकॉर्डही मोडला आहे. 'KGF 2' ला मागे टाकल्यानंतर गदर 2 लवकरच पठानला ही मागे टाकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT