Alia Bhatt Got Married Twice In Four Days Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Wedding: आलियाने केलं एकाच आठवड्यात दोनदा लग्न? नेमकी काय आहे भानगड, वाचा सविस्तर

Alia Bhatt 2 Wedding's: आलियाने एकाच आठवड्यात दोन लग्न केल्याचे वक्तव्य करण जोहरने एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Alia Bhatt Got Married Twice In Four Days:

आलिया भट्ट सध्या बॉलिवूडमधील ट्रेडिंगची अभिनेत्री आहे. आलिया- रणवीरचा 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. दरम्यान आलियाने एकाच आठवड्यात दोन लग्न केल्याचे वक्तव्य करण जोहरने (Karan Johar) एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष स्वत:कडे वेधले आहे.

आलिया रणवीरची चित्रपटातली लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अनेक किस्से घडले होते. त्या दरम्यानचाच एक किस्सा करणने मुलाखतीत सांगितला.

आलियाच्या लग्नाच्या चार दिवसांनंतरच तिचा चित्रपटातील लग्नाचा सीन शुट करण्यात आला होता. 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' चित्रपटाचे प्रदर्शनानंतर देखील अगदी दणक्यात प्रमोशन सुरू आहे. (Bollywood Actress)

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनेक किस्से समोर येत आहेत. अशातच दिग्दर्शक करण जोहरने सांगितलेल्या माहितीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

प्रमोशनमध्ये करण जोहर म्हणतो, 'चित्रपटातील रॉकी आणि रानीच्या लग्नाचं शुट आलियाच्या लग्नाच्या चार दिवसांनी करण्यात आले. त्यामुळे एका आठवड्यात आलियाचे दोनदा लग्न झाले. एक खऱ्या आयुष्यात तर एक रिल लाईफमध्ये तिने लग्न केलं होतं. या सीनमध्ये जी मेहंदी आलियाच्या हातावर आहे, ती तिच्या खऱ्या लग्नातील आहे. आम्ही फक्त मेहंदीचा रंग थोडा डार्क केला होता. चित्रपटातील लग्नावर आधारित गाणे जैसलमेरमध्ये शुट करण्यात आले होते'. (Bollywood Film)

या गाण्यामध्ये आलियाच्या हातावरची मेहंदी खूपच डार्क दिसत होती. तिच्या लग्नातलीच मेहंदी शूटमध्ये होती. त्यामुळे एकाच आठवड्यात रिअल आणि रिल लाईफमध्ये आलियाने लग्न केले होते. रणवीर आलियाच्या लव्ह केमिस्ट्रीला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

'रॉकी और रानी की प्रेमकहानी' चित्रपटाने १० दिवसांत १०० कोटींचा पल्ला गाठला आहे. चित्रपटाची जगभरात चांगलीच चर्चा सुरू आहे. चित्रपटात रणवीर आणि आलियासोबत धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन आणि मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

Edited By: Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; दुध टँकरची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Mumbai Rains : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, अंधेरी सबवे पाण्याखाली, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जॅम|VIDEO

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT