Aishwarya Rai And Abhishek Bachchan 17th Wedding Anniversary Instagram
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai And Abhishek Bachchan Wedding Anniversary : ऐश्वर्या- अभिषेकने सेलिब्रेट केला लग्नाचा १७ वा वाढदिवस; घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान समोर आला फॅमिलीचा नवा फोटो

Aishwarya Rai And Abhishek Bachchan : अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दूरावा आला असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ऐश्वर्याने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे त्यांच्या नात्यातील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Chetan Bodke

Aishwarya Rai And Abhishek Bachchan 17th Wedding Anniversary

बच्चन कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्या नात्यात दूरावा आला असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्ट्स आणि त्यांचा कमी झालेला एकत्र वावर यामुळे या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या. पण नुकतंच ऐश्वर्याने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे त्यांच्या नात्यातील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकने २० एप्रिलला त्यांच्या लग्नाचा १७ वा वाढदिवस साजरा केला. (Bollywood)

अवघ्या काही तासांपूर्वीच ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिषेक, ऐश्वर्या आणि लेक आराध्या यांचा एक सेल्फी शेअर केलेला आहे. सेल्फी शेअर केल्यानंतर अभिषेकच्या आणि ऐश्वर्याच्या नात्यातील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अभिषेकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, ऐश्वर्या, आराध्यासोबतचा फोटो शेअर करत हार्ट ईमोजी कॅप्शनमध्ये देत फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या तिघांचा फॅमिली फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंदीस हा फोटो पडलाय. पोस्टवर कमेंट सेक्शनमध्ये अनेक युजर्सने वेडिंग ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या. (Bollywood News)

सगळ्यांना पसंत पडला असून अनेकांनी कमेंट करत त्यांना वेडिंग ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. २० एप्रिल २००७ ला अभिषेक आणि ऐश्वर्याने शाही थाटात लग्नगाठ बांधली. अतिशय खासगी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला होता. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नसोहळ्याचे फार फोटोज उपलब्ध नाहीत. पण या लग्नसोहळ्याला इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली असल्याची चर्चा होत आहे. त्यांच्या लग्नानंतरच्या विधींचे फोटोजही बराच काळ चर्चेत होते. (Social Media)

अनेक इव्हेंटला अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र न दिसल्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ऐश्वर्याचं सासू-सासऱ्यांसोबत (अमिताभ बच्चन आणि जया बच्चन) यांच्या जुळत नसल्याच्या चर्चांनी जोर धरला. याला सगळेजण अभिषेकची बहीण श्वेताला जबाबदार धरत होते. त्याआधी सर्व बच्चन कुटूंबीय आर्चीजच्या प्रीमियरला एकत्र हजेरी लावलेली होती, तेव्हापासून या अफवांना पूर्णविराम मिळाला. त्यानंतर अनेक इव्हेंटला बच्चन कुटुंबीयांनी एकत्र उपस्थिती लावली होती. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

Maharashtra Politics : 'पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली'; सत्ताधारी महिला आमदाराचा सभागृहात खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT