aditi mukherjee accident  Saam tv
मनोरंजन बातम्या

Shocking : मनोरंजन विश्वाला पुन्हा धक्का; तरुण अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू

aditi mukherjee accident : मनोरंजन विश्वाला पुन्हा धक्का बसला आहे. तरुण अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

मनोरंजन विश्वाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय

कामिनी कौशल यांच्या निधनानंतर आदिती मुखर्जीचा अपघाती मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडकेत या अभिनेत्रीचा अंत

मनोरंजन विश्वाला पुन्हा धक्का बसला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांच्या निधनानंतर आणखी एका अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्धनगरमध्ये अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू झाला आहे. ती घरातून गौतम बुद्धनगर विद्यापीठात एका शोसाठी जाताना तिचा अपघाती मृत्यू झाला. तिने महिपालपूर येथून कॅब बुक केली. ती कॅबने विद्यापीठात जाण्यासाठी निघाली. मात्र, वाटेतच एका भरधाव वाहनाच्या धडकेत या अभिनेत्रीचा अंत झाला.

आदिती मुखर्जी असे या अभिनेत्रीचे नाव आहे. अपघात झाल्यानंतर आदितीला ग्रेटर नोएडा येथील शारदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान आदितीचा मृत्यू झाला. आदितीच्या भावाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मूळची ओडिशाची असलेली आदिती सध्या दिल्लीच्या महिलापालपूर येथे राहत होती.

आदिती मुखर्जीचा भाऊ अरिदम मुखर्जी यांनी सांगितलं की, 'आदितीने १६ नोव्हेंबर रोजी रात्री घराजवळून एका शोसाठी गौतम बुद्ध विद्यापीठात जात होती. त्याचवेळी वाटेत तिचा अपघात झाला. तिच्या कॅबला भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात आदिती गंभीर जखमी झाली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान आदितीचा मृत्यू झाला'.

पोलिसांनी आदितीच्या भावाच्या तक्रारीवरून गु्न्हा नोंदवत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. अस्मिता थिएटरचे डायरेक्टर अरविंद गौर यांनी सोशल मीडियावर आदितीला श्रद्धांजली वाहिली आहे. गौर यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, 'अस्मिता थिएटरची माजी विद्यार्थिनी आदिती मुखर्जीने जगाचा निरोप घेतला आहे. परी चौकाजवळील ग्रेटर नोएडा महामार्गावरील रस्ते दुर्घटनेत गंभीर जखमी झाला. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तबंबाळ झाली'.

'आदितीला तातडीने ग्रेटर नोएडा येथील शारदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केलेल्या आदितीच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आम्हाला अपेक्षा आहे की, पोलीस लवकरच या अपघातातील दोषींना शिक्षा देतील. आदितीलचे आई-वडील उशीरा ओडिशाहून दिल्लीला पोहोचले. आदितीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नोएडा येथे पाठवण्यात आला होता. दिल्लीतील सेक्टर-९२ येथील स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : घराणेशाहीचा रेकॉर्ड मोडला; भाजप अन् शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी

Winter Health: हिवाळ्यात दिवसभर किती लिटर पाणी प्यावे?

ऐन निवडणुकीत IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

Winter Yoga Time: हिवाळ्यात योगा करण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?

Wednesday Horoscope: ४ राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभाची शक्यता; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT