Sreela Majumdar Saam tv
मनोरंजन बातम्या

Sreela Majumdar Passes Away : अभिनेत्री श्रीला मजुमदार यांची कर्करोगाशी झुंज अपयशी, 65व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sreela Majumdar Passes Away : श्रीला या बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रीला मजुमदार यांनी 'चोखेर बाली' या चित्रपटात ऐश्वर्या रायसाठी व्हॉईस डबिंग केले होते.

प्रविण वाकचौरे

Sreela Majumdar Passes Away :

चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी आली आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री श्रीला मजुमदार यांचं वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झालं आहे. मजुमदार यांचे कोलकाता येथे निधन झाले आहे. मजूमदार या मागील साडेतीन वर्षांपासून गर्भाशयाच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. काल म्हणजेच 27 जानेवारी 2024 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. श्रीला यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच रविवारी कोलकाता येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

श्रीला मजूमदार यांच्या निधनामुळे बंगाली चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. श्रीला यांच्या निधनाने चाहत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. श्रीला या बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रीला मजुमदार यांनी 'चोखेर बाली' या चित्रपटात ऐश्वर्या रायसाठी व्हॉईस डबिंग केले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'परशुराम' चित्रपटातून पदार्पण

श्रीला यांनी 1980 मध्ये 'परशुराम' चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले, ज्यात 'द पार्सल चोख', 'अमर पृथ्वी', 'खार्जी', 'असोल नाकोल' आणि 'नागमोती' अशा चित्रपटांचा समावेश आहे.  (Latest Marathi News)

बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटांमध्ये काम

श्रीला मजुमदार यांनी केवळ ऐश्वर्यासोबतच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबतही काम केले आहे. ज्यात नसीरुद्दीन शाह, स्मिता पाटील, शबाना आझमी यांसारख्या मोठ्या कलाकारांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

SCROLL FOR NEXT