Vikram gokhle  Saam TV
मनोरंजन बातम्या

Vikram Gokhale: विक्रम गोखलेंनी अनुपम खेर यांना दोन आठवड्यांपूर्वी पाठवला होता मेसेज, "मित्रा जीवन अपूर्ण आहे..." पाहा VIDEO

अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत ते एक कविता वाचताना दिसत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale)  यांची प्राणज्योत आज मालवली. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचं निधन झालं विक्रम गोखले यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.अनुपम खेर यांनी काही दिवसांपूर्वीच विक्रम गोखले यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता.

अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत ते एक कविता वाचताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना अनुपम खेर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "मला हा मेसेज 12 दिवसांपूर्वी माझा प्रिय मित्र आणि देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडून मिळाला होता. मी त्यांना फोन केला आणि सांगितले की तुम्ही मला पाठवलेली कविता अपूर्ण आहे. त्यांनी मला सांगितले की, मित्रा जीवन देखील अपूर्ण आहे.आणि मग हसायला लागले.

विक्रम गोखले यांच्या 'अनुमती' या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या 'द सिग्नेचर' या चित्रपटाचे शूटिंग मी काही दिवसांपूर्वीच पूर्ण केले आहे. आम्ही याबद्दल देखील बोललो. त्याने मला विचारले की तू चित्रपट कधी दाखवतोस? मी तुला दाखवायला घाबरलोय असं सांगितलं.

यावर मोठमोठ्याने हसत तो म्हणाला होता की मग चांगलंच केले असेल. तो माझा चित्रपट कधीच पाहू शकणार नाही याचे मला येथे वाईट वाटत आहे. विक्रम गोखले, तू नेहमीच माझा चांगला मित्र राहशील. यासोबतच अनुपम खेर यांनी एक हार्ट ब्रेकिंग इमोजी शेअर केला होता. त्यावेळी विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death: चित्रपटसृष्टीवर शोककळा; सलमानसोबत काम केलेल्या प्रसिद्ध बॉडी-बिल्डर अभिनेत्याचा मृत्यू

Pune Terror Alert : पुण्यात दहशतवादी घुसले? ATS सह पोलिस यंत्रणा सतर्क

Bhaiyya Gaiwad : किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला भैय्या गायकवाडला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Manoj Jarange : मनोज जरांगे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट; सव्वा तास बंद दाराआड काय चर्चा झाली?

Richa Ghosh : 4 सेंटीमीटरने केला घात! अवघे 6 रन्स शिल्लक असताना हुकलं शतक; Video पाहून तुम्हीही चुकचुकाल

SCROLL FOR NEXT