Vijay Sethupathi Net Worth Instagram
मनोरंजन बातम्या

Vijay Sethupathi Net Worth: कोट्यवधींचा मालक; तरीही सिंपल राहणीमान, संपत्ती पाहून डोळे विस्फारतील...

Vijay Sethupathi Birthday: टॉलिवूड अभिनेता विजय सेथूपती आज ४६ वा वाढदिवस साजरा करतोय.

Chetan Bodke

Vijay Sethupathi Net Worth

टॉलिवूड अभिनेता विजय सेथूपतीचा आज आपला ४६ वा वाढदिवस साजरा करतोय. कायमच बहुआयामी अभिनयामुळे ओळखला जाणाऱ्या विजय सेथूपतीचा जन्म १६ जानेवारी १९७८ ला झाला आहे. विजय सेतूपतीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या स्ट्रगल स्टोरीबाबत आणि संपत्तीबाबत...

उत्कृष्ट अभिनयासोबतच आपल्या सिंपल स्टाईलसाठी विजय सेथूपती ओळखला जातो. त्याने सिंपल शर्ट-पँट आणि स्लिपरमध्ये राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला होता. विजयने शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे, तर शाहिद कपूरच्या 'फर्जी' चित्रपटातून ओटीटी विश्वात डेब्यू केले आहे.

कमी उंची असल्यामुळे विजयला कधीही चांगला चित्रपट मिळत नव्हता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्याने एका रिटेल स्टोअरमध्ये सेल्समनची नोकरी सुरु केली. त्यानंतर अभिनेत्याने अनेक ठिकाणी जॉब केले. विजयला उंचीमुळे अनेक ठिकाणी रोल नाकारले होते, पण त्याने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचेच मन जिंकले. २०१० मध्ये रिलीज झालेल्या 'थेनमुर्क परुवाकाटरू' या चित्रपटातून विजयला लिड रोल मिळाला. तर २०१५ मध्ये रिलीज झालेल्या 'ऑरेंज मिठाई' या चित्रपटातून लेखक आणि निर्माता क्षेत्रामध्ये पदार्पण केले.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयची एकूण संपत्ती 140 कोटी रुपये आहे. त्याचा चेन्नईमध्ये एक बंगलाही आहे ज्याची किंमत जवळपास 50 कोटी रुपये आहे. याशिवाय अभिनेत्याला अनेक महागड्या गाड्यांचाही शौक आहे. त्याच्याकडे BMW 7 सीरीज आहे, ज्याची किंमत 1.78 कोटी रुपये आहे. विजय सेतुपती एका चित्रपटासाठी १५ कोटी रुपये घेतात. जवानाची नकारात्मक भूमिका साकारण्यासाठी त्याने २१ कोटी रुपये घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT