Vibhu Raghave Diagnosed With Stage 4 Cancer Instagram @vibhuzinsta
मनोरंजन बातम्या

TV Actor Suffering From Cancer: 'हा' टीव्ही कलाकार देतोय कॅन्सरशी झुंज; उपचारासाठी करतोय मदतीची अपेक्षा

मोहित आणि अदिती मलिक यांनी सोशल मीडियावर मागिलती विभूसाठी मदत.

Saam Tv

Actor Vibhu Raghave Diagnosed With Stage 4 Cancer: टीव्ही शो 'निशा और उसके कजिन्स'मध्ये सौरवची भूमिका साकारणारा अभिनेता विभू राघवे याला कॅन्सर झाला आहे. गेल्या वर्षी त्याला समजले की तो कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर आहे. गेल्या वर्षी स्वत: अभिनेत्याने त्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती.

गेल्या एक वर्षापासून तो कॅन्सरवर उपचार घेत असून आता त्यांच्याकडे पैसे संपले आहेत. इंडस्ट्रीतील त्याचे मित्र मोहित मलिक आणि अदिती मलिक यांनी एक फंड सुरू केला आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याला मदत करू शकतील.

मोहित आणि अदिती मलिक यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे, 'दुर्मिळ कोलन कर्करोगाशी लढा देत असलेला आमचा मित्र वैभव कुमार सिंह राघवे याच्या उपचारासाठी आम्ही पैसे गोळा करत आहोत. ही बातमी आमच्यासाठी धक्कादायक होती, कृपया त्याला मदत करा. जेणेकरून त्यांच्यासाठी हा प्रवास सुकर होईल.'

अदिती आणि मोहित यांनी शेअर केलेल्या पोस्ट्मधेय लिहिले आहे की, गेल्या वर्षी विभूवर उपचार सुरू असताना त्याने चांगला प्रतिसाद दिला होता, पण पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली आणि त्याला अजून चांगल्या उपचारांची गरज आहे.

त्यांनी सांगितले की ketto.org वरून जमा केलेला सर्व निधी संपला आहे आणि सध्या तो मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि इम्युनोथेरपी घेत आहेत, या एका थेरपीची किंमत 4.5 लाख रुपये आहे. उपचारासाठी खूप मोठी रक्कम लागणार आहे, आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करत आहोत पण तुम्हीही मदत केली तर हा मार्ग सुकर होईल.

'निशा और उसके कजिन्स' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये काम केलेला अभिनेता मोहसिन खान यानेही विभूच्या उपचारासाठी मदतीची आवाहन केले आहे. विभूने 'सावधान इंडिया'च्या अनेक एपिसोडमध्येही काम केले आहे. विभू स्वत: देखील हॉस्पिटलमधील त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो आणि चाहत्यांना त्याच्या तब्येतीची माहिती देत ​​असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT