Varun Dhawan Saam Tv
मनोरंजन बातम्या

वरुण धवनला 'अशा' फिल्ममध्ये करायचे काम, स्वतःच त्याने व्यक्त केली इच्छा

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आगामी काळात अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. 'बावल' आणि 'भेडिया' हे त्याचे आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन(Varun Dhawan) आगामी काळात अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. 'बावल' आणि 'भेडिया' हे त्याचे आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट आहेत. सध्या वरूण 'बावल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच वरूणच्या 'जुग जुग जिओ'(Jug jugg Jeeyo) या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करताना अभिनेता वरूणने त्याच्या चित्रपट निवडीविषयी रंजक खुलासा केला आहे.

वरुण धवन सध्या 'बावल'च्या शूटिंगसाठी परदेशात आहे. वरूण सोशल मीडियाच्या माध्यमातून शूटिंग संदर्भात चाहत्यांना नेहमी माहिती देत असतो. अलीकडेच, वरूणने त्याच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानची एक पोस्ट शेअर करत 'बावल' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

'बावल' चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर एका मुलाखतीत वरूणने त्याच्या चित्रपट निवडीविषयी सांगितले दरम्यान, वरुणने त्याला आता कोणत्याप्रकारचे चित्रपट करायचे आहेत हे देखील सांगितले. एका प्रश्नाचे उत्तर देताना वरूणने त्याला क्राउड एंटरटेनर आणि मास फिल्म करायचे असल्याचे स्पष्ट केले. शिवाय, तो म्हणाला की शूजित सरकार, नितेश तिवारी आणि श्रीराम राघवन यांसारख्या चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम केल्यामुळे त्याचे अभिनय कौशल्य आणखी सुधारलं आहे.

पुढे वरूणने सांगितले की, 'अमर कौशिकच्या 'भेडिया' सारखे छान काम मला पुन्हा करायचे आहे आणि अलीकडच्या काळात मी असे खास काम केले नाही. 'बदलापूरमध्ये दिनेश विजनसोबत काम करणे मला खूप छान वाटले. मी त्याला म्हणालो होतो, 'तू नेहमी माझ्याकडे असे विचित्र स्क्रिप्ट का घेऊन येतोस ? त्यावर तो मला म्हणाला होता की, 'तू मास एंटरटेनर करत असलात तरी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तुला आणखी नवीन स्क्रिप्ट शोधण्याची गरज आहे'.

'बवाल' चित्रपटात वरूण आणि जान्हवी मुख्य भूमिकेत असणार आहेत. वरूण आणि जान्हवी पहिल्यांदाच केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियावालाने केली असून नितेश तिवारी याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 'बवाल' हा चित्रपट ७ एप्रिल २०२३ ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT