Varun Dhawan To Shift New House Saam Tv
मनोरंजन बातम्या

Varun Dhawan To Shift New House: वरुण धवन लवकरच होणार अक्षय कुमारचा शेजारी? हृतिक रोशनचं घर घेतलं भाड्याने

Varun Dhawan To Shift Hrithik Roshan House On Rent: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या चर्चेत आला आहे. वरुण धवनच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यानंतर आता वरुण धवन नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतो. वरुण धवन हा अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. वरुण धवन नुकताच बाबा झाला आहे. वरुण धवन आणि नताशा दलालला मुलगी झाली आहे. वरुण आणि नताशाने मोठ्या आनंदात लहान पाहुण्याचे स्वागत केले आहे. वरुण धवन आपल्या कुटुंबासोबत लवकरच शिफ्ट होणार आहे. वरुण धवन लवकरच जुहू येथे शिफ्ट होणार आहे.

वरुण धवनचे कुटुंब खूप मोठे आहे. त्यातआता त्याला मुलगीदेखील झाली आहे. त्यामुळेच वरुणने शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, वरुण धवनने अभिनेता हृतिक रोशनचा जुहू येथील घर भाड्याने घेतले आहे. लवकरच वरुण आपल्या कुटुंबासोबत या घरात शिफ्ट होणार आहे.

वरुण धवन आणि नताशा आपल्या लेकीसोबत जुहू येथील सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहे. हृतिक सध्या या घरात राहत आहे. परंतु तो लवकरच दुसऱ्या घरात शिफ्ट होणार असल्याचे सांगण्याच येत आहे. वरुण धवन ज्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहे त्याच्याच बाजूला अभिनेता अक्षय कुमार आणि निर्माता साजिद नाडियालवाला राहत आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वरुण आता अक्षय कुमारचा शेजारी होणार आहे. सध्या वरुण धवन आणि नताशा जुहूमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहत आहे. हे घर त्याने २०१७ मध्ये विकत घेतले होते.

वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, वरुण शेवटचा कलंक या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर बऱ्याचा काळानंतर वरुण आता 'स्त्री २' चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. वरुण धवनच्या नवीन चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udgir Fort History: मध्ययुगीन युद्धभूमी आणि भव्य संरचना, उदगीर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Solapur : सोयाबीनच्या बीलापोटी मिळालेला चेक बँकेत भरल्यानंतर चोरीला; दुसऱ्याच खात्यावर वटला ४ लाखाचा चेक

Sshura Khan : खान कुटुंबाची सून शूरा आहे तरी कोण? वाचा Unknown Facts

Pune Traffic Protest : चाकणपेक्षा गुजरात बरा! वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उद्योजक रस्त्यावर उतरले

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आणि शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT