Actor Uttar Kumar Arrested For Physical Assaulting of 25 Year Old new Actress for 3 years Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; २५ वर्षीय अभिनेत्रीवर सिनेमात काम देण्याचं आमिष देऊन ३ वर्ष अत्याचार केल्याचा आरोप

Famous Actor Arrest: हरियाणवी सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता उत्तर कुमार सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. २५ वर्षीय अभिनेत्रीवर शारीरिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Shruti Vilas Kadam

Famous Actor Arrest: हरियाणवी सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता उत्तर कुमार सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. २५ वर्षीय अभिनेत्रीवर ३ वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ पीडित अभिनेत्रीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडला. पीडित अभिनेत्रीने तक्रार दाखल करताना सांगितले की, शूटिंगच्या वेळी उत्तर कुमारने तिच्याशी गैरवर्तन केले आणि शारीरिक अत्याचार केला. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अभिनेता उत्तर कुमारला ताब्यात घेतले.

'२०२३ मध्ये पार्टीनंतर बलात्कार आणि धमकी'

पीडित अभिनेत्री आरोप केले की ऑगस्ट २०२० मध्ये एका म्युझिक व्हिडिओच्या शूटिंग दरम्यान तिची उत्तर कुमारशी भेट झाली. या गाण्यामुळे दोघांनाही लोकप्रियता मिळाली. अभिनेत्रीने असा दावा केला आहे की आरोपीने चित्रपटात लीड रोल देण्याचे आश्वासन देऊन तिचा विश्वास जिंकला, परंतु त्यानंतर तो सतत तिचे लैंगिक शोषण करत होता. तक्रारीनुसार, २०२३ मध्ये एका चित्रपटाच्या यशाच्या पार्टीनंतर उत्तर कुमारने पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर तिला सतत ब्लॅकमेलही केले. पीडितेला जातीवाचक शब्द बोलण्यात आले आणि धमक्याही देण्यात आल्या.

या वर्षी जून २०२५ मध्ये पीडितेने शालीमार गार्डन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यानंतर, एफआयआर नोंदवण्यात आला नाही तेव्हा, २ जुलै रोजी अभिनेत्रीने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आणि उत्तर कुमारवर ३ वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. अखेर पोलिसांनी २३ जुलै रोजी एफआयआर नोंदवला. परंतु त्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने, या महिन्यात ६ सप्टेंबर रोजी लखनऊ येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ पीडितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पोलीसांनी अभिनेत्याला अटक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाकिस्तानचंही नेपाळ होणार? जनआक्रोशामुळं अराजकता, उद्रेकाची पाकिस्तानी मंत्र्यांना भीती

Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या वडिलांचा नवा कारनामा, अपहरण नाट्यावरचा पडदा अखेर उघडला

Blouse Designs: जरीच्या साड्यांवर ब्लाउस शिवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? जाणून घ्या

Indian Currency: भारतीय नोटांच्या मागील बाजूस कोणकोणत्या भाषांचा वापर करण्यात आला आहे? वाचा सविस्तर

Pakistan Attack: पाकिस्तानी सैन्यांवर बलूच आर्मीकडून मोठा हल्ला, मेजरसह ४ जवानांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT