Sushant Singh Rajput Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतच्या घरातील लाडक्या सदस्याचं निधन, कुटुंबियांना दु:ख अनावर

सुशांत सिंगचा पेट डॉग 'फज'ने या जगाचा निरोप घेतला आहे.

Pooja Dange

Sushant Singh Rajput's Family Lost Another Member: चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनाला जवळपास अडीच वर्षे झाली आहेत. सुशांत आपल्यातून निघून गेला असेल, पण तो अजूनही त्याच्या चाहत्यांच्या आणि कुटुंबाच्या आयुष्यातून गेलेला नाही. सुशांतच्या कुटुंबियांनी त्याच्या आठवणी आजही जपून ठेवल्या आहेत. दरम्यान, राजपूत कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सुशांत सिंगचा पेट डॉग 'फज'ने देखील या जगाचा निरोप घेतला आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीने फजच्या मृत्यूची बातमी दिली आहे. तिने एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये सुशांत आणि फजचे दोन फोटो शेअर केले आहेत. पोस्ट शेअर करताना सुशांतची बहिण प्रियंका सिंगने लिहिले की, “फज खूप दूर गेलास. तू स्वर्गात तुझ्या मित्राकडे गेलास. आम्हीही लवकरच येऊ. तोपर्यंत... तुम्ही नेहमी आठवण येत राहिलं.

सुशांत सिंग राजपूतचे 14 जून 2020 रोजी निधन झाले. वांद्रे येथील फ्लॅटमध्ये तो मृतावस्थेत आढळला होता. प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केल्याचे समजले. मात्र, सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात ड्रग्जच्या अँगलने तपास झाला आणि सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीला तुरुंगात जावे लागले. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सुशांतनंतर त्याच्या चाहत्यांना त्याच्या लाडक्या फजच्या निधनाने दु:ख झाले आहे. प्रियांकाच्या पोस्टवर कमेंट करून ते त्यांच्या भावना व्यक्त करत आहे. एका युजरने लिहिले आहे की, “कृपया स्ट्रॉन्ग राहा…काय बोलावे ते कळत नाही. ही बातमी ह्रदय पिळवटून टाकणारी आहे… मला सहन होत नाहीये… पण आता तो त्याच्या मित्राकडे आनंदाने जाणार आणि त्याचा मला आनंद आहे.

एका चाहत्याने लिहिले की, "मला आशा आहे की त्यांचे बॉण्ड स्वर्गात देखील असाच राहिलं." तर दुसऱ्याने लिहिले, “ही हृदयद्रावक बातमी आहे. फज, आता तू आमच्या सुशांतबरोबर स्वर्गात जाणार आहेस.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT