Subodh Bhave Google
मनोरंजन बातम्या

Subodh Bhave : सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' नंतर 'देवमाणूस' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Subodh Bhave : तेजस देऊस्कर दिग्दर्शित देवमाणूस चित्रपटात अभिनेता सुबोध भावे देखील मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे देखील काम करणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Subodh Bhave : तेजस देऊस्कर दिग्दर्शित देवमाणूस या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या एक से एक कलाकारांच्या टीम मध्ये आता अभिनेता सुबोध भावे सामील झाला आहे. अभिनेता सुबोध भावे, महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दिग्गज कलाकारांसोबत यंदा स्क्रीन शेअर करणार आहेत, त्यामुळे हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे ज्यात आकर्षक आणि उच्च दर्जाचे नाटक संपूर्ण महाराष्ट्र आणि बाहेरील प्रेक्षकांना आकर्षित करेल आणि अनुभवायला मिळेल.

बालगंधर्व, आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर, कट्यार काळजात घुसली, यांसारख्या चित्रपटातील त्याच्या अविस्मरणीय अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला सुबोध भावे, ज्यांची प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. सुबोध भावे नेहमी आपल्या प्रत्येक भूमिकांमध्ये स्वतःला बुडवून घेण्याची क्षमता ठेवतो. कॉम्प्लेक्स, स्टेबल यांसारख्या विविध लेवलची पात्र साकारण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल त्याचं अनेकदा कौतुक झालं आहे. या चित्रपटासाठीचे त्याचे योगदान नक्कीच चित्रपटाच्या कथेला एक नवीन आयाम देईल.

देवमाणूसच्या कलाकारांसोबत सामील होण्याबद्दल अभिनेता सुबोध भावे म्हणाला , “मला यापूर्वी दिग्गज अभिनेते महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दोघांसोबत स्वतंत्रपणे चित्रपटात काम करण्याचा बहुमान मिळाला आहे, परंतु देवमाणूसमध्ये पहिल्यांदाच त्यांच्यासोबत एकत्र काम करणे हा खरोखरच माझ्यासाठी एक रोमांचक अनुभव आहे. या चित्रपटाचा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे आणि आमचे सामूहिक प्रयत्न पाहून प्रेक्षकांकढून कसा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहण्यासाठी मी आतुर आहे.”

देवमाणूस या चित्रपटाचे इतर तपशील जरी गुपित असले तरी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आधीच एक प्रकारची कास्टिंगची माहिती देऊन निश्चितच या सिनेमासाठी प्रेक्षकांची आवड निर्माण केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना कुणाची? सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेसेनेला फटकारले; बेजबाबदार वक्तव्य थांबवा

PM Modi UAE Visit: तेल साठे ते एलपीजी पुरवठा; पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

SCROLL FOR NEXT