Sohail Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sohail Khan:'लहानपणी माझं लैंगिक शोषण झालं होतं'; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Sohail Khan: सोहेल खानने लहानपणी झालेल्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक खुलासा केला. सीमा सचदेहसोबतच्या घटस्फोटाबाबतही त्याने मनमोकळेपणाने भाष्य करत आपल्या चुकांची कबुली दिली.

Shruti Vilas Kadam

Sohail Khan: बॉलिवूडच्या दबंग सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता निर्माता सोहेल खानने नुकत्याच 'अलायंस' या शोमध्ये आपल्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी अनुभवाचा खुलासा केला. लहानपणी आपले लैंगिक शोषण झाले होते, मात्र लाज आणि भीतीमुळे अनेक वर्षे ही गोष्ट कोणालाही सांगू शकलो नाही, असे त्याने सांगितले. त्याच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांसह अनेकजण भावूक झाले आहेत.

सोहेलने सांगितले की, "खरं तर, लहानपणी माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते आणि मी अनेक वर्षे ही गोष्ट मनातच दाबून ठेवली होती. मी मोठा झालो तेव्हा मी माझ्या वडिलांशी त्याबद्दल बोललो. मी त्यांना सांगितलं, 'बाबा, माझ्यासोबत असं घडलं होतं.' त्यांनी विचारलं, 'बाळा, इतकी वर्षे तू ही गोष्ट स्वतःपाशीच का ठेवलीस?' मी उत्तर दिलं, 'मला खूप वाईट वाटतंय, पण हे सांगायला मला खूप लाज वाटत होती. यात माझी काहीच चूक नव्हती, पण त्या वेळी मला नाही समजलं की कसं सांगितलं पाहिजे.'"

याच अनुभवामुळे मी रॅगिंग आणि कोणत्याही प्रकारच्या छळाचा तीव्र विरोध करतो, असेही सोहेलने स्पष्ट केले. तो आपल्या मुलांना निर्वाण आणि योहान नेहमी सांगतो की, कोणत्याही प्रकारचा त्रास वाटल्यास ती गोष्ट मनात न ठेवता लगेच कुटुंबीयांशी बोलावी. अडचणी लपवून न ठेवता संवाद साधणे हेच योग्य असल्याचा सल्ला तो त्यांना देत असतो.

याचं शोमध्ये सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सचदेह देखील आहे. १९९८ मध्ये या दोघांनी लग्न केलं. सोहेल आणि सीमा यांनी जवळपास २४ वर्षांच्या सहजीवनानंतर २०२२ मध्ये घटस्फोट घेतला. मात्र, विभक्त झाल्यानंतरही दोघे मिळून मुलांचे संगोपन करत आहेत. मुलांच्या आनंदाला सर्वाधिक प्राधान्य देत तो आणि सीमा आजही एकमेकांचा आदर करतो, असे सोहेलने सांगितले. मुलांना भेटण्यासाठी सीमाकडे घराची चावीही असल्याचा खुलासा त्याने केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajwain Water Benefits: रोज सकाळी ओव्याचं कोमट पाणी प्या; गॅस, ब्लोटिंग, वजन कमी होण्यासह मिळतील 'हे' ७ फायदे

DCS MH App: आता मोबाईलवरूनच करता येणार पीक नोंदणी, ‘या’ ॲपचा वापर करा

Kidney Damage : किडनी खराब होण्यापूर्वी मुलांच्या शरीरात दिसतात ‘ही’ धोक्याची ७ लक्षणं; वेळीच ओळखा, नाहीतर...

ATM मधून पैसे काढताना कधी किती चार्ज लागतो; जाणून घ्या SBI, HDFC, ICICI, PNB चे नियम

Maharashtra News Live Update: जरांगेंच्या मागण्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा सरकारला टोला

SCROLL FOR NEXT