Koffee With Karan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan: बॉलिवूडचा 'हा' हँडसम हंक करणार लग्न? 'कॉफी विथ करण'मध्ये होणार उघड

लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण सीझन ७' मध्ये लवकरच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राआणि अभिनेता विकी कौशल सहभागी होऊन त्यांच्या आयुष्याविषयी खुलासे करताना दिसणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Koffee With Karan |मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा(Karan Johar) लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण सीझन ७' मध्ये अनेक सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या या चॅट शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. आता लवकरच या शोमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharth Malhotra) आणि अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal) सहभागी होऊन त्यांच्या आयुष्याविषयी खुलासे करताना दिसणार आहेत. अर्जुन कपूरपासून ते अनन्या पांडेपर्यंत सर्वांनीच या चॅट शोमध्ये करण जोहरच्या प्रश्नांची उत्तरे देत अनेक गुपितं उघड केली आहेत. अशा परिस्थितीत आता या शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्राची एन्ट्री खूपच रंजक असणार आहे. कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ त्याच्या लग्नाबद्दल खुलासा करताना दिसत आहे.

त्याचबरोबर 'कॉफी विथ करण या शोच्या सातव्या पर्वात लग्नाविषयी आणखीन चर्चा होताना दिसणार आहे. कारण काही महिन्यांपूर्वी लग्न झालेला अभिनेता विकी कौशल आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​या एपिसोडमध्ये सहभागी होणार आहेत. आगामी एपिसोडमध्ये विकी कौशल आणि करण जोहर सिद्धार्थ मल्होत्राच्या विरोधात एक टीम होऊन सिद्धार्थला त्याच्या लग्नाच्या अफवांबद्दल अनेक मजेदार प्रश्न विचारताना दिसत आहेत.

आगामी एपिसोडमध्ये, शोचे होस्ट करण जोहर आणि विकी कौशल, शोमध्ये सिद्धार्थवर त्याची गर्लफ्रेंड कियारा अडवाणीसोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकताना दिसतात पण, सिद्धार्थ मल्होत्रा 'मी तुम्हाला उज्ज्वल आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा देतो', असे उतर देतो. त्यामुळे आता त्याच्या सर्व चाहत्यांना त्याच्या आणि कियाराच्या लग्नाची उत्सुकता आहे.

करण जोहरच्या शोचा हा प्रोमो वेगाने व्हायरल होत आहे. आता चाहते विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत. वास्तविक, या शोमध्ये सिद्धार्थ आणि कियारा यांच्यातील नात्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

SCROLL FOR NEXT