Hou De Dhingana 2  Instagram
मनोरंजन बातम्या

Hou de Dhingana 2 Show: 'मेहनतीचं असं फळ मिळालं की बरं वाटतं', TRP च्या शर्यतीत सिद्धार्थ जाधवचा ‘आता होऊदे धिंगाणा २’ ठरला नंबर १

Actor Siddharth Jadhav: टीआरपीच्या लिस्टमध्ये ‘आता होऊ दे धिंगाणा’ या शोने बाजी मारल्यानंतर सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

Priya More

Marathi Serial TRP Rating:

टीव्ही मालिका हा प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. चित्रपट किंवा वेबसीरीज पाहणाऱ्यांपेक्षा मालिका पाहणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. प्रेक्षक कोणती मालिका जास्त पाहतात हे मालिकेच्या टीआरपीवरून ठरते. दरआठवड्याप्रमाणे या आठवड्याचा टीव्ही मालिकांच्या टीआरपीचा आकडा समोर आला आहे.

टीआरपीच्या लिस्टमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या (Siddharth Jadhav) शोने बाजी मारली आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा’ (Hou de Dhingana Show) हा रियालिटी शो ‘महाराष्ट्राचा नंबर १ नॉन फिक्शन शो’ ठरला आहे. टीआरपीच्या लिस्टमध्ये ‘आता होऊ दे धिंगाणा’ या शोने बाजी मारल्यानंतर सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिद्धार्थ जाधवने नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'मायबाप रसिक प्रेक्षकांना मनापासून आभार ...मेहनतीचं असं फळ मिळालं की बरं वाटतं. "आता होऊ दे धिंगाणा पहिला सीजन" लोकांना आवडला होता. दुसरा सीजन करताना लोकांना तो कसा आवडेल? याची धाकधूक होती, पण पहिल्याच एपिसोडला ऐवढा तुफान रिस्पॉन्स... खरंच खूप बरं वाटतं.'

तसंच, 'सतीश राजवाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली श्रीप्रसाद आणि सुमेध, फ्रेम्सची संपूर्ण टीम स्टार प्रवाहच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे हे फळ आहे. तुम्ही सगळे मायबाप रसिक प्रेक्षक महाराष्ट्राचा नंबर १ नॉन फिक्शन शो म्हणून तुम्ही "आता होऊदे धिंगाणा२ "ला आशीर्वाद दिलात. खरंच खूप बरं वाटतंय आणि नवीन काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. हे पोस्ट करताना मनात फक्त wow फिलिंग आहे...Wow... वा किती मस्त! असच प्रेम असुदे ...' या पोस्टद्वारे सिद्धार्थने प्रेक्षकांचे आभार मानले आहे. सिद्धार्थच्या या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी त्याचे खूप कौतुक केले आहे.

टीआरपी लिस्टनुसार नॉन फिक्शन शोमध्ये सिद्धार्थ जाधवच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ हा शो नंबर वन ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकवर ‘चला हवा येऊ द्या’ हा शो आहे. तिसऱ्या क्रमांकावर ‘सारेगमप’, चौथ्या क्रमांकावर ‘बिग बॉस वीकेंडचा वार’, पाचव्या क्रमांकावर ‘सूर नवा ध्यास नवा’, सहाव्या क्रमांकावर 'इंडियन आयडल' तर सातव्या क्रमांकावर 'इंडियाज गॉट चॅलेंज' हे शो आहेत.

दरम्यान, सिद्धार्थ जाधवच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या शोच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती दिली होती. हा शो २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर फेब्रुवारी २०२३ मध्ये या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. हा शो संपल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले होते. या शोच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर निर्मात्यांनी या शोचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. ‘आता होऊ दे धिंगाणा’ चा दुसरा सीझन २१ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटील आला. या शोसाठी पहिलाच आठवडा जबरदस्त ठरला असून टीआरपीच्या लिस्टमध्ये या शोने बाजी मारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT