मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आई सुनंदा शेट्टी यांना 21 लाख रुपये कर्ज परत न केल्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने सुनंदा यांना जामीन दिला आहे. याशिवाय त्यांच्या विरोधातील जामिनपात्र वॉरंट देखील कोर्टाने रद्द केला आहे. शिल्पाचे वडील सुरेंद्र शेट्टी यांनी ऑटोमोबाईल एजन्सीचे मालक पार्शद फिरोज आमरा यांच्याकडून कॉर्गिफ्ट्स या शेट्टी कुटुंबातील कंपनीसाठी 21 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. (Sunanda Shetty News)
हे देखील पहा -
परंतु शिल्पाचे वडील सुरेंद्र यांच्या निधनानंतर त्यांना पैसे परत केले गेले नाहीत. मात्र ते कर्ज परत न भरल्याप्रकरणी आमरा यांनी तक्रार दिली होती. गेल्या सुनावणीत सुनंदा कोर्टात हजर राहिल्या नाहीत, त्यानंतर त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. याप्रकरणाची मंगळवारी कोर्टात सुनावणी झाली. याआधी महानगर दंडाधिकारी आर. आर. खान यांनी शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना यांना जामीन देत जामीनपात्र वारंटही रद्द केला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.