Sharad Ponkshe file photo
Sharad Ponkshe file photo  saam tv
मनोरंजन बातम्या

'कर्नाटकात कानडी भाषा...'; मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नसल्याने शरद पोंक्षे भडकले

प्रदीप भणगे

Sharad Ponkshe News : सध्या मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आले असले तरी, अनेकदा चित्रपट निर्मात्यांपासून ते कलाकारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात स्क्रीन्स उपलब्ध होत नाहीत. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याने त्यावर अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था डोंबिवली शाखा यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन या व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मण सभागृह येथे रविवारी पार पडलेल्या या व्याख्यानानंतर शरद पोंक्षे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याने त्यावर भाष्य केलं आहे.

पोंक्षे म्हणाले, मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. भांडायची गरजच लागली नाही पाहीजे न मागता आपोआप मिळायला हवे. महाराष्ट्रात मराठी माणसाला सर्व मिळाले पाहीजे, पण ते होत नाही, कारण आमची इच्छाच नाही आहे. कर्नाटकात कानडी भाषा ही सक्तीची आहे, महाराष्ट्रात मराठी का होऊ शकत नाही ? मराठीला प्राईम टाईम शो देण्याचे कबुल केल्यानंतरच थिएटरला परवानगी मिळते, पण तेवढे शो मिळतात का हे कोणीच पहात नाही'.

'सगळ्यांचेच एकमेकांबरोबर लागेबंधे आहेत. सर्व पक्षांच्या आज चित्रपट संघटना आहेत, मात्र त्याही काही काम करत नाही. चित्रपट महामंडळ आहे ते ही काम करत नाही. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी काही तरी करायला हवे. केवळ शो नाही म्हणून चित्रपट निर्मात्याचे किती नुकसान होते. दोन आठवड्यांनी शो मिळून काय फायदा. मराठीत शंभरातले दोन चित्रपट चालतात त्यात ही अवस्था असेल तर कसे होणार', असे म्हणत पोंक्षे यांनी चिंता व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

Mumbai Metro: मतदारांना विशेष सवलत; मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर मिळणार १० टक्के सूट

Sanjay Nirupam : संजय निरुपम २० वर्षांनंतर पुन्हा शिवसनेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

PM Modi: पंतप्रधान मोदी १४ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज, १३ तारखेला वाराणसीत करणार मोठा रोड शो

SCROLL FOR NEXT