शरद केळकर, नाव ऐकताच त्याचा भारदस्त आवाज आपल्या कानी घुमतो. अभिनयामुळे नाही तर आवाजामुळे शरदने आपली ओळख सिनेसृष्टीत निर्माण केली आहे. शरद केळकरने फिल्मी कारकिर्दिमध्ये मालिकेत, चित्रपटामध्ये आणि स्टेज शोच्या माध्यमातून आपल्या आवाजाची प्रेक्षकांमध्ये छाप पाडली. असा हा बहुगुणी अभिनेता शरद केळकर आज (७ ऑक्टोबर) आपला ४७ वा वाढदिवस साजरा करतोय.
मराठी सिनेसृष्टीतच नाही बॉलिवूडमध्ये आणि टॉलिवूडमध्येही त्याने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये निर्माण केली. पण शरद केळकर मुळचा महाराष्ट्राचा नाही. त्याचा जन्म मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमधील एका मराठी कुटुंबात झाला. लहान वयातच पितृछत्र गेल्यानंतर तो आई आणि बहिणीच्या खूपच जवळ आहे.
आई आणि बहिणीने शरदला नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा दिली. शरदला बालपणी एक आजार होता. आणि त्याच आजारावर मात करुन अभिनेत्याने यशाचे शिखर गाठले. तो अडखळत बोलायचा यामुळे अनेकदा त्याचे मित्र त्याची टींगल उडवायचे. त्याला बालपणी ‘स्पीच डिसऑर्डर’ हा आजार होता. हा अडखळत बोलण्याचा आजार होता.
आज त्या आजारावर शरदने यशस्वी मात करत यशाचे शिखर गाठले आहे. लहानपणापासूनच अभिनयामध्ये आवड असलेल्या शरदने आपल्या करियरची सुरुवात फिटनेस ट्रेनर म्हणून केली होती. त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात ‘आक्रोश’ मालिकेतून केली. या मालिकेच्या माध्यमातून त्याने इंडस्ट्रित डेब्यु केलं. होस्टिंग आणि टेलिव्हिजन मालिकेत काम केल्यानंतर शरदने काही वर्षांनी छोट्या मालिकेंच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केलं.
शरदच्या सर्वाधिक भुमिका ‘सीआयडी’, ‘उतरन’, ‘रात होने को है’ मालिकेतून त्याला आणखी प्रसिद्धी मिळाली. त्यासोबतच ‘रॉक-अँड-रोल’, ‘सारेगामापा चॅलेंज’, ‘पती-पत्नी और वो’सारख्या शोमध्ये होस्टिंग तर, ‘नच बलिए २’ मध्ये शरदने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. शरदला अनेक बॉलिवूड चित्रटांमधून प्रसिद्धी मिळाली असून त्याने ‘तान्हाजी’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे साकारलेले पात्र चाहत्यांना प्रचंड आवडले. त्याने काही चित्रपटांमध्ये महाराजांचे पात्र देखील साकारले. त्यासोबतच ‘बाहुबली’तल्या अमरेंद्र बाहुबली या व्यक्तीरेखेला सुद्धा त्याने आवाज दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.