Shah Rukh Khan Hospital Discharged Saam Tv
मनोरंजन बातम्या

SRK Hospital Discharged : शाहरुख खानला रुग्णालयातून डिस्चार्ज, अहमदाबादहून थेट मुंबई गाठली; IPL फायनलला हजेरी लावणार का?

Shah Rukh Khan Hospital Discharged : बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याला गुरूवारी रात्री उशिरा के.डी.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याला बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिहायड्रेशनच्या त्रासामुळे अभिनेत्याला अहमदाबादमधील के.डी.रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. नुकतंच अभिनेत्याची हेल्थ अपडेट समोर आली आहे. त्याला काल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे.

किंग खानला रुग्णालयामध्ये दाखल केल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आले होते. सोशल मीडियासह सर्वत्र त्याच्या तब्येत सुधारावी यासाठी चाहते प्रार्थना करत होते.

गुरुवारी (२३ मे) संध्याकाळी उशिरा शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिने किंग खानची हेल्थ अपडेट सोशल मीडियावरून दिली आहे. जारी केलेल्या हेल्थ अपडेटमध्ये तिने माहिती दिली की, "किंग खानची तब्येत आता ठीक आहे. आता अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर तो थेट अहमदाबादहून मुंबईला रवाना झाला आहे." हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर शाहरुख खानने अहमदाबादहून चार्टर्ड विमानाने रातोरात घरी पोहोचला आहे. तो मुंबईत आल्याच्या अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत, शाहरुख खान, गौरी खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी हे सर्व मुंबईत रात्री उशिरा दाखल झाले आहेत. तो कारमध्ये बसत असताना त्याच्या टीमने त्याच्यावर छत्री पकडली होती. त्यामुळे तो व्यवस्थित दिसला नाही. २१ मे २०२४ ला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. आपल्या टीमला चिअर करण्यासाठी अभिनेता खास स्टेडियममध्ये पोहोचला होता. वाढत्या तापमानाचा अभिनेत्यालाही प्रचंड त्रास झाल्यामुळे त्याला बुधवारी (२२ मे) तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स टीमने पहिला क्वालिफायर सामना जिंकला आहे. ही टीम चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे. आता रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये शाहरूख खान टीममधील प्लेयर्सना चिअर्स करण्यासाठी मैदानात येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

SCROLL FOR NEXT