vimal pan masala ad shah rukh khan ajay devgan and tiger shroff Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: गुटख्याच्या जाहिरातींवरून शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत; कार्टाकडून समन्स जारी

Shahrukh Khan: विमल पान मसालाच्या जाहिरातीतील ‘केशर’ दाव्यावरून शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ग्राहक न्यायालयाने नोटीस बजावली आहे. कार्टाने ९ जुलैला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Shruti Vilas Kadam

Shahrukh Khan: बॉलिवूडमधील तीन अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्यासमोर नवीन कायदेशीर अडचण उभी राहिली आहे. राजस्थानमधील बारन जिल्हा ग्राहक न्यायालयाने या तिघांना तसेच विमल पान मसालाचे मालक विमल अग्रवाल यांना नोटीस बजावत ९ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गुटखा आणि पान मसाल्याच्या जाहिरातींमधून ग्राहकांची दिशाभूल केल्याचायां आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

बारन येथील ‘नागरिक अधिकार संस्था’चे सचिव वीरेंद्र सिंह यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, विमल पान मसालाच्या जाहिरातींमध्ये पान मसाल्यात ‘केशर’ असल्याचा दावा केला जातो. मात्र, अवघ्या ५ रुपयांच्या पाऊचमध्ये लाखो रुपये किलो दर असलेले केशर वापरले जाते, हा दावा त्यांना खोटा वाटत असून ग्राहकांना चुकीची माहिती देणारा आहे. या प्रकरणात तक्रारदाराने न्यायालयात असा युक्तिवाद केला आहे की, या प्रकारच्या जाहिराती ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन करतात. तसेच आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या प्रोडक्टचा अप्रत्यक्ष प्रचार केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या जाहिरातींवर देशभरात बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जुलै रोजी होणार असून न्यायालयाने या प्रकरणात अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ आणि विमल अग्रवाल यांना त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीद्वारे उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहक न्यायालयाच्या आदेशानुसार, नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत आरोपींनी आपली बाजू आणि आवश्यक पुरावे सादर करणे बंधनकारक आहे.

न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, जर संबंधित पक्ष सुनावणीला अनुपस्थित राहिले, तर त्यांच्याविरोधात एकतर्फी (Ex Parte) सुनावणी करून निर्णय दिला जाऊ शकतो. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सेलिब्रिटी एंडोर्समेंट्स, ग्राहक संरक्षण आणि जाहिरातींमधील दाव्यांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा चर्चेत आला आहे. आता ९ जुलैच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सान्निध्यातील प्राजक्ता माळीचं आलिशान फार्महाऊस; जाणून घ्या एका दिवसाचं भाडं

Maharashtra News Live Update: पोलादपुर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस वाहतुकीसाठीसाठी बंद

पावसाचा हाहाकार! घराचा स्लॅब कोसळून आजी-नातवाचा मृत्यू

RBI: जुन्या बँक खात्यातले पैसे विसरलात? RBI च्या मदतीने मिळवा तुमची रक्कम

School Holiday: सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, KDMC चा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT