सलमानने खुद्द सांगितली ;ती' थरारक घटना Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Snake Bit | 'त्या' रात्री नेमकं काय घडलं, सलमानने खुद्द सांगितली 'ती' थरारक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला 25 डिसेंबरच्या मध्यरात्री साप चावला (Snake Bit). त्यानंतर संपूर्ण मनोरंजन सृष्टीत खळबळ माजली. मात्र, सुदैवाने साप तितका विषारी नसल्याने सलमान लवकर बरा झाला. त्यानंतर आज त्याने स्वत: त्या रात्री काय घडले हे सांगितलं आहे. (Actor Salman Khan Told About The Snake Bit Incident)

सलमानने माध्यमांना सर्पदंश कसा झाला, त्या रात्री नेमकं काय घडलं याबाबतची माहिती दिलीये. "माझ्या फार्महाऊसमध्ये साप घुसला होता, मी काठीने त्याला बाहेर काढले. पण तो माझ्या हातावर आला. मग मी त्याच्यापोसून सुटका होण्यासाठी त्याला पकडले, तेव्हा त्याने मला तीनदा चावा घेतला. तो विषारी साप होता. मला 6 तास रुग्णालयात ठेवण्यात आले. पण, मी आता ठीक आहे", असं सलमान खानने (Salman Khan) सांगितलं.

वाढदिवसापूर्वी समलानसोबत दुर्घटना

आज सलमान खानचा 56 वा वाढदिवस आहे. 25 डिसेंबरला सलमान खान आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये होता. मध्यरात्री त्याला सर्पदंश झाला. परंतु, बिनविषारी सापाने चावा घेतल्याने सलमान खानला रुग्णालयातून 6 तासांनंतर सोडण्यात आलं. सलमानला मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता अशा परिस्थितीत तो त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे की नाही हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा -

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT