Salman Khan 35 Years Completed Instagram
मनोरंजन बातम्या

Salman Khan 35 Years Completed: सलमान खानची बॉलिवूडमध्ये ३५ वर्ष पूर्ण; भाईजानला चाहत्यांचं भन्नाट सरप्राईज, Video Viral

35 Years Of Salman Khan:भाईजानने २६ ऑगस्टला ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटाच्या माध्यमातून १९८८ मध्ये बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती.

Chetan Bodke

35 Years Of Salman Khan

‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ हैं’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडच्या दबंग अभिनेत्याने स्वत:चे स्थान निर्माण केले. महत्वपूर्ण भूमिका असुद्या किंवा ‘वॉन्टेड’ आणि ‘दबंग’ सारख्या चित्रपटांतली सलमानची अॅक्शन असो, कायमच अभिनेता आपल्या अभिनयामुळे चर्चेत असतो. अभिनेता सलमान खान कायमच दमदार अभिनयामुळे प्रकाशझोतात असतो. सलमानला इंडस्ट्रीमध्ये ३५ वर्ष पूर्ण झाले आहे. भाईजानने २६ ऑगस्टला ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटाच्या माध्यमातून १९८८ मध्ये बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

भाईजानने ३५ वर्षांचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल सलमान खानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. सलमान खानने त्याच्या चित्रपटातील काही दृश्यांचा व्हिडीओ एकत्र करत, व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या चित्रपटातील काही प्रसिद्ध संवाद, काही त्याच्या फेमस हूक स्टेप्स दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर करताना सलमान म्हणतो,“35 वर्षे 35 दिवसांसारखी वाटली, प्रेक्षकहो, तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मी तुमचे आभारी आहे...”

सलमान खानच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी त्याला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमानने शेअर केलेल्या व्हिडीओवर एक नेटकरी म्हणतो, ‘इथे दुसरा सलमान खान कधीच असू शकत नाही.’ तर आणखी एक नेटकरी म्हणतो, ‘मी म्हातारा झालो तरी सलमान खान नेहमीच माझा आवडता अभिनेता राहणार.’ तर आणखी एक युजर म्हणतो, ‘बॉलिवूडमध्ये ३५ वर्ष पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन आणि प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद.’

सलमान खानचा अखेरचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ हा असून त्याने ‘बिग बॉस OTT 2’मध्ये होस्टिंग केले होते. बिग बॉसचे शूटिंग आटोपताच सलमान आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र झाला आहे. त्यासोबत भाईजान मोस्ट अवेटेड ‘टायगर ३’मध्ये देखील तो झळकणार आहे.

सलमान कतरिना कैफसह इमरान हाश्मी, विशाल जेठवा आणि रिद्धी डोगरा या दमदार कलाकारांची फौज ‘टायगर ३’मध्ये दिसणार आहे. सलमानचा ‘टायगर ३’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवेल अशी सध्या चर्चा होत आहे.

चित्रपटामध्ये शाहरुख खान पाहुणा कलाकार पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘टायगर ३’नंतर सूरज बडजात्याच्या ‘प्रेम की शादी’ या चित्रपटातही तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT