Navra Maza Navsacha 2 Movie Shooting Starts Saam Tv
मनोरंजन बातम्या

Navra Maza Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा २' च्या कमाईमध्ये चांगलीच घसरण, तिसऱ्या आठवड्यात केली फक्त 'इतकी' कमाई

Navra Maza Navsacha 2 Box Office Collection Day 14: सुप्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगांवकर यांच्या 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाच्या कमाईमघ्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे.

Saam Tv

सुप्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांचा सुपरहिट चित्रपट 'नवरा माझा नवसाचा २' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट २००५मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटसुद्धा चित्रपटगृहामघध्ये सुपरहिट ठरला होता. या चित्रपटामधील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांकडून ऐकायला मिळतात.

'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाचा सिक्वल सुद्धा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास यशस्वी ठरला आहे. अनेक चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली होती. या चित्रपटामधील गाण्यांनी प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरतोय ते त्यांच्या जबरदस्त स्टारकास्ट आणि कलाकारांच्या अभिनयामुळे.

अभिनेता सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांचा 'नवरा माझा नवसाचा २' हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १००० पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.८५ कोटींची कमाई केली होती. तर विकेंडला चित्रपटाने ३.८५ कोटींचा गल्ला जमावला होता. हा चित्रपट प्रदर्शित होईन तब्बल १३ दिवस झाले आहेत. १३व्या दिवशी या चित्रपटाने १.१३ कोटींची कमाई केली आहे. तर १३ दिवसांमद्ये चित्रपटाने १८.३४ कोटींचा गल्ला गाठला आहे.

काही दिवसांपासून 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कमी होताना दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. त्यासोबतच अभिनेता स्वप्नील जोशी, महाराष्ट्रा भूषण पुरस्कृत अशोक सराफ, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि सिद्धार्थ जाधव या कलाकार मंडळींनी या चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकली आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रसिद्ध गायक सोनु निगम याने गाणं गायलं आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: भररस्त्यात तरुणाकडून कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार, मुंबईमधील भयंकर घटना; VIDEO पाहून नागरिक संतापले

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग

Railway Exam Rules: रेल्वे परीक्षेच्या नियमात मोठा बदल; पेपरवेळी परीक्षार्थींना 'या' गोष्टीची असणार मुभा

Ind Vs Eng 3rd Test : रिषभ पंत पाठोपाठ केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदरही तंबूत; लॉर्ड्सचा कसोटी सामना भारताच्या हातून निसटला?

Jalna News: अरे बापरे...! दारू प्यायलेला मुख्याध्यापक डुलक्या देत वर्गातच झोपला अन् तिथेच... व्हायरल Video पाहाच

SCROLL FOR NEXT