Maharashtra Politics: रोहित पवार भावी मुख्यमंत्री होणार का?, सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं...

Supriya Sule On Rohit Pawar: रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर राज्यभरामध्ये झळकले होते. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
Maharashtra Politics: रोहित पवार भावी मुख्यमंत्री होणार का?, सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं...
Supriya Sule And Rohit PawarSaam TV
Published On

नितीन पाटणकर, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी 'रोहित पवार भावी मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर झळकले होते. नवी मुंबई, नाशिक आणि अहमदनगरमध्ये हे बॅनर झळकले. यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत. याचसंदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. यापूर्वीच शरद पवार यांनी याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. मंत्रिपदाच्या कुठल्या शर्यतीत नसल्यामुळे त्यावर चर्चा करण्याचा विषयच नाही.' असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी त्यांचे 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले होते. जामखेडच्या खर्डा येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आगामी काळात मंत्री होण्याचे संकेत दिले. दरम्यान रोहित पवारांच्या समर्थकांकडून त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होतो. याबाबत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'मलाच विशेष वाटते की लोक एवढ्या मोठ्या पदाबाबत माझ्या नावाची चर्चा करतात. हे जनतेचे प्रेम आहे पण बॅनर लावून काही होत नसतं त्यासाठी खूप काम करावं लागतं. मी कोणत्याही पदासाठी काम करत नाही तर महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी काम करतो.'

Maharashtra Politics: रोहित पवार भावी मुख्यमंत्री होणार का?, सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं...
Maharashtra Politics News: बाळासाहेबांचं नाव घेता आणि मोदी-शहांकडे का जाता?; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल

सुप्रिया सुळे यांनी वाडिया कॉलेजमध्ये आंदोलकांची भेट आज घेतली. वाडिया कॉलेजमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि इतर पदाधिकाऱ्यांनी गेटवर आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'देशाभरातून लोकं त्यांच्या मुलामुलींना पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात. पुण्याला चांगलं शहर म्हणून ओळख आहे. ही घटना झालीच कशी याचा फॉलोप आम्ही घेणार आहोत. सरकार लाडकी बहीण म्हणून १५०० रुपये देतात. पण आज अनेक महिला म्हणतायत आम्हाला १५०० रुपये नको. आमच्या मुली सुरक्षित ठेवा.'

सुप्रिया सुळे यांनी पुढे सांगितले की, 'याआधी आंदोलन करून सुद्धा अॅक्शन झाली नव्हती म्हणून हे परत आंदोलन करत आहेत. पुण्याप्रमाणे मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये अशी घटना घडली. ज्या हास्पिटलमध्ये राज्यातून मुली येतात डॉक्टर होऊ पाहतात. तिथल्या डॉक्टरवर अॅक्शन घेतलेली नाही. महिला सुरक्षितता हे प्राधान्य नाही या असंवेदनशील सरकारचं आहे.' तसंच, 'डेटा सांगतोय की महाराष्ट्रमध्ये ट्रिपल इंजिन सरकार आल्यापासून महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत. वर्दीची भीती राहिलेली नाही. काल बारामती, इंदापूरला घडलेली घटना धक्कादायक आहे. गृहमंत्री कायं करतायत या राज्याचे? त्यांनी उत्तर देयला हवं.', अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

Maharashtra Politics: रोहित पवार भावी मुख्यमंत्री होणार का?, सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं...
Maharashtra Politics: सध्याचे सरकार बैल पुत्र, त्यांचा बाप बैल, त्यांची बुद्धीही बैलाची; संजय राऊतांची सरकारवर टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com