Ranveer Singh Saam tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh: रणवीर सिंहला 'डॉन 3'मधून एक्झिट घेणं पडलं महागात; FWICEने अभिनेत्याला इंडस्ट्रीमधून केलं बॅन

Ranveer Singh: रणवीर सिंहबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज'ने (FWICE) त्याला चित्रपटसृष्टीतून बॅन करण्याचे आदेश जारी केला आहे.

Shruti Vilas Kadam

Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या मोठ्या वादात अडकला आहे. 'डॉन 3' चित्रपटातून अचानक बाहेर पडल्याच्या प्रकरणावरून फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने त्याच्याविरोधात नॉन-कोऑपरेशन निर्देश जारी केलं आहे. या निर्णयामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फरहान अख्तर दिग्दर्शित डॉन 3 या बहुचर्चित चित्रपटातून रणवीर सिंहने अचानक माघार घेतली. या निर्णयामुळे निर्माते आणि निर्मितीसंस्थेला मोठा आर्थिक फटका बसल्याचा आरोप करण्यात आला आहे. फरहान अख्तर आणि निर्माता रितेश सिधवानी यांनी इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFTDA) मार्फत FWICE कडे अधिकृत तक्रार दाखल केली होती.

FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगसाठी युनिट रवाना होण्याच्या अवघ्या काही आठवडे आधी रणवीरने प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणाला गंभीर मानत FWICE ने रणवीरविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.

काही अहवालांनुसार, ‘डॉन 3’च्या प्री-प्रोडक्शनवर सुमारे ४० ते ४५ कोटी रुपयांचा खर्च झाला होता. रणवीरच्या अचानक बाहेर पडण्यामुळे निर्मात्यांनी नुकसानभरपाईची मागणीही केल्याचे म्हटले जात आहे. मात्र या संपूर्ण वादावर रणवीर सिंहने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Don 3 हा लोकप्रिय ‘डॉन’ फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. यापूर्वीच्या दोन चित्रपटांमध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसला होता. २०२४ मध्ये फरहान अख्तर यांनी रणवीर सिंह नवीन ‘डॉन’ म्हणून प्रेक्षकांसमोर आणला होता. त्याचा फर्स्ट लूकही प्रचंड चर्चेत आला होता. अभिनेत्री कियारा अडवाणी देखील या चित्रपटात झळकणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT