Ramayana Movie Released In How Many Parts Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ramayana Movie : 'रामायण' चित्रपटाचे किती भाग प्रदर्शित होणार ?, दिग्दर्शकांनी केला मोठा खुलासा; प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

Ramayana Movie Released In How Many Parts : दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी 'रामायण' चित्रपट तीन भागांत रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता नुकतंच दिग्दर्शकांनी चित्रपटाबद्दल महत्वाचा निर्णय घेतला.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झालेली आहे. अनेकदा सोशल मीडियावर चित्रपटाच्या रणवीर आणि साई पल्लवी यांचा लूक, सेटवरील अनेक फोटो असे फोटो लिक झाले होते, तेव्हापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल फार उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट तीन भागांत रिलीज होणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण आता मिळालेल्या माहितीनुसार निर्मात्यांनी हा बहुचर्चित चित्रपट दोन भागांत रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश तिवारी यांनी चित्रपट तीन भागांत नाही तर, दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. रणबीर, सई पल्लवी आणि सनी देओलसोबत चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झालेली आहे. चित्रपटाची एकूण शुटिंग जवळपास ३५० दिवस चालणार आहे. चित्रपटाची शुटिंग डिसेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. आणि त्यानंतर चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनच्या कामाला सुरुवात होणार आहे.

कलाकारांच्या वेळेप्रमाणे चित्रपटाची शुटिंग शेड्युल्ड करण्यात आलेली आहे.नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभु श्री रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या रणबीर चित्रपटातील त्याच्या लूकवर विशेष मेहनत घेत आहे. 'ॲनिमल' नंतर रणबीर 'रामायण' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या लूकमध्ये बरेच परिवर्तन पाहायला मिळत आहे. सध्या रणबीरच्या नव्या अंदाजाची जोरदार चर्चा होत आहे.

रणबीर कपूर आणि सई पल्लवी व्यतिरिक्त केजीएफ स्टार यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल भगवान हनुमानाच्या भूमिकेत, लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत तर बॉबी देओल कुंभकरणच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रणबीर शेवटचा 'ॲनिमल' चित्रपटात दिसला होता. रणबीर 'रामायण' चित्रपटाव्यतिरिक्त दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय रणबीर आणि आलिया 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सिक्वेलचाही भाग असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

कुलूपबंद मदिरा, रोखल्या नजरा,मद्यपींचे होणार वांदे, सोमवारी ड्राय डे?

SCROLL FOR NEXT