Prabhas and Shruti Hasan Fee for Salaar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salaar Movie : ‘सालार’मध्ये प्रभासच महागडा अभिनेता, तर श्रृतीचं मानधन तुटपुंज

Prabhas and Shruti Haasan Fee for Salaar : प्रभासचे मानधन ऐकून तुमच्या भूवया उंचावतील. तर श्रृती हसनचे मानधन ऐकून आश्चर्य वाटेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Salaar Actor Prabhas Shruti Hassan Fees Differences : प्रभासचा दमदार अॅक्शन असलेला 'सालार' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाची माहिती समोर आली आहे. प्रभासचे मानधन ऐकून तुमच्या भूवया उंचावतील. तर श्रृती हसनचे मानधन ऐकून आश्चर्य वाटेल.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा नेहमीच चर्चेत असतो. सध्या प्रभास त्याचा आगामी चित्रपट 'प्रोजेक्ट के' आणि 'सालार'मुळे चर्चेत आहे. नुकताच 'सालार' या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे.

टीजरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सालार या चित्रपटाचे बजेट २५० कोटी इतके आहे, असे सांगण्यात येत आहे. या बिग बजेट चित्रपटात प्रभास, श्रृती हसन हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटातील कलाकारांनी भरघोस मानधन घेतले आहे. मानधनाच्या यादीत सर्वात पहिले नाव प्रभासचं येतं. प्रभासने चित्रपटासाठी १०० कोटी इतके मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. प्रभासच्या या मानधनाच्या आकड्यांनी सर्वांनाच धक्का बसला आहे. याआधीही प्रभासने 'आदिपुरूष' आणि 'प्रोजेक्ट के'साठी एवढेच जास्त मानधन घेतल्याची चर्चा होती. परंतु या अफवा असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते.

प्रशांत नील निर्मित 'सालार' चित्रपटात श्रृती हसन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, श्रृतीने चित्रपटासाठी ८ करोड रुपये इतके मानधन घेतले आहे. त्यामुळे दोन्ही प्रमुख भूमिकेत असलेल्या कालाकराच्या मानधनातील खूप जास्त तफावत आहे. श्रृतीच्या मानधनावर आता अनेकांनी प्रश्न उपस्थित होत आहे. तर चित्रपटासाठी पृथ्वीराज सुकुमारनने ४ कोटी इतके मानधन घेतले आहे.

सालार चित्रपटाच्या टीजरला १०० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. चित्रपटाच्या टीजरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटात श्रृती आध्या हे पात्र साकारणार आहे. तर पृथ्वीराज, वर्धराज हे पात्र साकारणार आहे. प्रशांत नीलच्या 'केजीएफ'नंतर आता 'सालार' चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT