Bollywood actor Affair Saam TV
मनोरंजन बातम्या

Bollywood actor Affair : बॉलिवूडच्या 'ग्रीन फ्लॅग' अभिनेत्याचं अर्ध्या वयाच्या अभिनेत्रीसोबत अफेअर; पत्नीने केली पोलखोल

Bollywood actor Affair : गुप्तहेर तान्या पुरी यांनी पॉडकास्टमध्ये नाव न घेता एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत धक्कादायक दावे केले. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या नावाबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Shruti Vilas Kadam

Bollywood actor Affair : चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे आयुष्य दुरून झगमगीत आणि परिपूर्ण वाटते. मात्र, सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबाबत वेळोवेळी वेगवेगळे दावे समोर येत असतात. आता गुप्तहेर तान्या पुरी यांनी एका पॉडकास्टमध्ये केलेल्या धक्कादायक दाव्यामुळे बॉलिवूडमध्ये चर्चेला उधाण आले आहे. तान्या पुरी सध्या करण जोहरच्या ‘द ट्रेटर्स २’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहेत.

झहरा जानी यांच्या पॉडकास्टमध्ये तान्या यांनी एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत नाव न घेता अनेक मोठे खुलासे केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा अभिनेता लोकांच्या नजरेत ‘ग्रीन फ्लॅग’ म्हणजेच आदर्श पती आणि व्यक्ती म्हणून ओळखला जातो. त्याची प्रतिमा अत्यंत चांगली असून तो एक उत्तम पिता असल्याचेही मानले जाते.

तान्या यांच्या म्हणण्यानुसार, या अभिनेत्याची पत्नी काही अफवा ऐकल्यानंतर सत्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या कंपनीकडे आली होती. तिने पतीच्या वागणुकीबाबत चौकशी करण्यासाठी मदत मागितली होती. तपासादरम्यान अभिनेत्याचे काही तरुणींसोबत रिलेशन असल्याचे समोर आल्याचा दावा तान्या यांनी केला.

विशेष म्हणजे, या अभिनेत्याने अनेक अभिनेत्री असलेल्या चित्रपट फ्रँचायझीमध्ये काम केले होते. जिथे त्याला अनेक अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळाली. तान्या यांच्या म्हणण्यानुसार, , या अभिनेत्रींपैकी काहींसोबत त्याचे रिलेशन होते आणि त्या त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या होत्या.

तान्या यांनी पुढे म्हणाली, पती-पत्नीमध्ये अनेक वर्षांपासून शारीरिक जवळीक नाही. दोघे एका खोलीत झोपत नसल्याचे आणि मुलांची जबाबदारी स्वतंत्रपणे सांभाळत असल्याचे पत्नीने सांगितले होते. पण असे असूनही हे कपल अद्याप एकत्र आहे. सेलिब्रिटी असल्यामुळे त्यांना त्यांची बेस्ट कपलची प्रतिमा संभाळवी लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : ऑक्टोबरच्या कडक उन्हात वाढतो हाय BP चा धोका, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

Bike engine oil: किती किलोमीटर्सनंतर बदलायचं बाईकचं इंजिन ऑईल?

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT