Nassar Birthday  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nassar Birthday: नाकाची ठेवण अन् रुंद कपाळ ठरले फिल्मी करिअरमध्ये बाधा; जाणून घ्या नास्सार यांचा थक्क करणारा प्रवास

Nassar News: 'बाहुबली' चित्रपटामध्ये खलनायकायकाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला बिज्जलदेव म्हणजेच अभिनेता नास्सार यांचा आज ६६ वा वाढदिवस आहे.

Chetan Bodke

Nassar Birthday

'बाहुबली' (Bahubali Film) चित्रपटामध्ये खलनायकायकाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला बिज्जलदेव म्हणजेच अभिनेता नास्सार (Nassar) यांचा आज ६६ वा वाढदिवस आहे. कायमच आपल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत राहिलेले नास्सार यांचा बॉलिवूडमध्ये (Bollywood Film) फार मोठा चाहतावर्ग आहे. नास्सर यांनी आपल्या सिनेकारकिर्दित, विविध प्रकारच्या भूमिका साकारत अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली. अशा या हरहुन्नरी कलाकाराच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी जाणून घेऊ या. (Bollywood)

नास्सार यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. १९८५ मध्ये आलेल्या 'कल्याणा अगाथिगल' या तमिळ चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील त्यांची भूमिका जरी छोटी असली तरी नास्सार यांच्या साठी ते पात्रही फार मोठं होतं. एका छोट्या भूमिकेमुळे तरी का होईना डेब्यू करायला मिळाल्यामुळे, त्यांना प्रचंड आनंद झाला होता. त्यानंतर एसपी मुथुरमन यांच्या 'वेलाकरण' आणि 'वन्ना कानवुगल' मध्ये नास्सार यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. (Bollywood Actor)

नास्सार अभिनेता व्हावे अशी इच्छा त्यांच्या वडीलांची होती. ज्यावेळी नास्सार यांनी वडीलांना जेव्हा आपल्यालाही अभिनेता होण्याची इच्छा असल्याचे सांगितलं, तेव्हा त्यांनी केवळ पाठिंबाच दिला नाही तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत देखील केली. नास्सर यांची मेहनत आणि वडीलांची तीव्र इच्छाशक्ती यामुळे ते एक यशस्वी अभिनेता ठरले. नास्सार यांना आपल्या चेहऱ्यावरून अनेकदा टीका सहन करावी लागली होती. नाकाच्या ठेवणीमुळे आणि रुंद कपाळामुळे नास्सार यांच्यावर टीका झाली होती. यशस्वी अभिनेता होण्यासाठी दिसणं नाही तर, अभिनय महत्वाचा असतो. या माध्यमातून त्यांनी सर्वांचीच बोलती बंद केली. (Bollywood News)

आपल्या अभिनयाच्या जोरावर नास्सारने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. नास्सारने 'रोजा', 'वीरम', 'खुशी', 'चाची 420', 'रावडी राठोड', 'रमैया वस्तावैय्या', 'थलायवी' यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. बाहुबलीमधील बिज्जलदेवची आणि रावडी राठोडमधील बापूजीच्या निगेटिव्ह रोलमुळे ते चर्चेत आले होते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT