Actor On Smirti- Palash Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Smriti-Palash: स्मृती-पलाशचं लग्न का मोडलं? लग्नसोहळ्यासाठी सांगलीला गेलेल्या अभिनेत्यानं सांगितलं 'त्या' रात्री काय घडलं?

Actor On Smirti- Palash Wedding: स्मृती मंधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न अचानक का मोडलं? यावर अभिनेता नंदीश संधूने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. अफवा, रद्द झालेला विवाहसोहळा आणि खरी कारणं वाचा.

Shruti Vilas Kadam

Actor On Smirti- Palash Wedding: टीव्ही अभिनेता नंदीश संधूने भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधना आणि गायक-संगीतकार पलाश मुच्छल यांच्या अचानक मोडलेल्या लग्नाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे लग्न २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगली (महाराष्ट्र) येथे संपन्न होणार होतं. पण अचानकच हा लग्नसोहळा रद्द झाला आणि त्यानंतर दोघांनी शेवटी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

नंदीश संधू सांगतात की तो स्वतः या लग्नासाठी सांगलीला गेला होता. पण अचानक लग्नसोहळा रद्दच झाला आणि त्यांना नंतर कळालं की आता लग्न कधीच होणार नाही. तो म्हणाले की सुरुवातीला सर्वत्र सांगितले गेले की स्मृती मंधनाच्या वडिलांची तब्येत खराब असून ते रुग्णालयात आहेत आणि याच कारणामुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं. अफवा सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये पसरल्या त्यातून काही जण म्हणाले की पलाशने स्मृतीला फसवलं आहे, परंतु नंदीश यांनी अशा आरोपांवर मत व्यक्त करत म्हणाला, पलाशला आपली बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी.

एका मुलाखतीत नंदीश म्हणाला की, 'पलाशची बाजू ऐकण्यासाठी कोणीही त्याच्याशी संपर्क साधला नाही. मी लग्नाला गेलो होतो, पण लग्नच झालं नाही. नंतर मला कळलं की, हे लग्न मोडलंय. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळेच लग्न पुढे ढकललेलं.'

अभिनेता नंदीश पुढे म्हणाला की 'लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं, कारण तेच सांगण्यात आलं होतं. जे तुम्हाला सर्वांना सांगण्यात आलं होतं की, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडलीय. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते आणि म्हणूनच लग्न पुढे ढकलण्यात आलंय. नंतर, मला बातम्यांमधून भलतंच कळलं, मला ते कळल्यावर फार वाईट वाटलं. कारण काहीही असो, मी त्यांचं प्रेम पाहिलंय.मी गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांचं प्रेम फुलताना पाहिलंय. ते दोघे खूप क्युट कपल होतं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reel Star Prem Bhatia Accident: सुप्रसिद्ध रीलस्टारच्या दुचाकीचा अपघात, प्रेम भाटीचा उपचारादरम्यान मृत्यू

Matheran Trip Budget : मुंबई-पुण्याजवळचा स्वर्ग! माथेरान ट्रिपचा खर्च किती येतो? जाणून घ्या

RBI ची मोठी कारवाई! राज्यातल्या 'या' सहकारी बँकेवर 6 महिन्यांसाठी बंदी

Maharashtra News Live Update : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचाल करणे दुचाकी स्वराला उडवलं, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Raigad : रायगड हादरले! आईने ४ मुलांना विष पाजून स्वतःही संपवलं आयुष्य; नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT