Bollywood Actor Imran Khan Faces Immigration Action : प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान याला मुंबई पोलिसांनी एक मोठी नोटीस बजावली आहे. इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या एका निदर्शनात (आंदोलनात) इम्रान खान सहभागी झाला होता.
नेमके प्रकरण काय?
ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या या आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी इम्रान खानसह अनेकांना ताब्यात घेतले होते. इम्रान खान हा भारतीय नागरिक नसल्याचे समोर आले असून, तो परदेशी नागरिक किंवा ओसीआय (OCI) कार्डधारक आहे.
भारतीय नागरिक नसतानाही अशा आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे, इम्रान खानविरोधात इमिग्रेशन कायद्याच्या (Immigration Act) संबंधित तरतुदींनुसार मुंबई पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे चित्रपट आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.