Devdatta Nage Instagram @devdatta.g.nage
मनोरंजन बातम्या

Devdatta Nage: 'जय मल्हार' फेम अभिनेता देवदत्त नागेला अपघात, इन्स्टाग्रामवरून शेअर केली माहिती

देवदत्त नागेने अचानक मालिकेतून ब्रेक घेतल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे.

Pooja Dange

Devdatta Nage Had Accident: अभिनेता देवदत्त नागे 'जय मल्हार' या मालिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. त्याची खंडोबा ही भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. सध्या देवदत्त नागे 'जीव माझा गुंतला' या कार्यक्रमात एक नकारात्मक पात्र साकारत आहे. दरम्यान देवदत्त नागेला मालिकेचे शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याने मालिकेतेतून ब्रेक घेतला आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून देवदत्त नागेने पुन्हा टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण केले आहे. या मालिकेत देवदत्त तुषार देसाई असे नकारात्मक पात्र साकारत आहे. हे पात्र अंतर आणि मल्हार यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचे काम करत आहे. मालिकेतील बिझी शेड्युलमधून देवदत्तने अचानक ब्रेक घेतल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. (TV)

देवदत्त नागेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे त्याने सांगितले आहे. देवदत्तच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्याच्या फोटो देवदत्तने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. तसेच त्याने त्याला काय झाले हे सुद्धा सांगितले आहे. त्याने त्याला दुखापत झालेल्या जागी बाणाचे चिन्ह दाखवले आहे. देवदत्तने म्हटले आहे, 'प्रार्थनेत शक्ती असते, काही दिवस आराम करणार आहे. जीव माझा गुंतला'चे शूटिंग करता असताना छोटीशी दुखापत झाली. देवाच्या कृपेमुळे डोळा थोडक्यात वाचला.' (Celebrity)

शूटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे देवदत्त नागेने काही दिवस आराम करण्यासाठी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. त्याने शेअर केलेल्या या पोस्टनंतर चाहते त्याच्याविषयी काळजी व्यक्त करत आहेत.

Devdatta Nage Instagram Story

देवदत्त नागे आपल्याला बऱ्याच दिवसांनी मालिकेत काम करताना दिसत आहे. सध्या तो बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. अजय देवगनच्या तानाजी या चित्रपटामध्ये त्याने महत्वाची भूमिका साकारली होती. तसेच आता देवदत्त 'आदिपुरुष' या चित्रपट सुद्धा दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lasuni Khakhra: घरीच १० मिनिटांत बनवा चटपटीत लसूणी खाखरा, चहाची चव वाढवेल

भाजपच्या उमेदवाराला अडवल्याने केंद्रीय मंत्री आणि पोलिसांमध्ये बाचाबाची|VIDEO

High BP: उच्च रक्तदाब हळूहळू शरीराला पोखरतो; प्रवासात हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या ४ घातक सवयी जाणून घ्या

Maharashtra Nagar Parishad Live : बोगस मतदान करताना चार-पाच जणांना पकडलं, बुलडाण्यात गोंधळ

Maharashtra Live News Update: कागल नगरपालिका मतदान केंद्रावर गोंधळ

SCROLL FOR NEXT