Actor Darshan Arrested: रेणुकास्वामी हत्या प्रकरणातील अभिनेता दर्शनचा जामीन गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. त्यात म्हटले आहे की, अशा "गंभीर प्रकरणात" जामीन मंजूर केल्याने आरोपींवर याचा प्रभाव पडू शकतो. जामीन रद्द झाल्यानंतर, अभिनेत्याला बेंगळुरूमधून काही तासातच अटक करण्यात आली आहे.
न्यायाधीश जे.बी. पारडीवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय रद्द करत हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने दर्शनला तात्काळ अटक करण्याचे आदेशही दिले आहेत. निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की उच्च न्यायालयाचा आदेश चुकीचे आहेत कायद्यासामोर सगळे समान असतात. "ज्या दिवशी न्यायालयाला कळेल की आरोपीला ५ स्टार सेवा दिले जातात, त्यावेळी आधी तुरुंग अधीक्षकांना निलंबित करण्यात येईल," असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
रेणुकास्वामी हत्याकांडातील अभिनेता दर्शन आणि इतर आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात लेखी युक्तिवाद सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. कर्नाटक सरकारच्या वतीने दर्शनचा या प्रकरणात सहभाग असल्याचे सिद्ध करण्यासाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आले आणि उच्च न्यायालयाचा जामीन मंजूर करण्याचा निर्णय सदोष असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
नेमकं प्रकरण काय?
दर्शन आणि सह-आरोपी पवित्रा गौडा हिचा जामीन देखील रद्द करण्यात आला आहे आणि तिलाही तिच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. ३३ वर्षीय रेणुकास्वामी याचे चित्रदुर्ग येथून अपहरण करण्यात आले होते आणि नंतर गेल्या वर्षी जूनमध्ये पवित्रा गौडा हिला अश्लील संदेश पाठवल्याबद्दल बेंगळुरूमधील एका शेडमध्ये छळ करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपपत्रात असे उघड झाले होते की रेणुकास्वामींवर केवळ हल्ला करण्यात आला नाही तर विद्युत उपकरणाचा वापर करून त्यांच्या गुप्तांगांना झटका देण्यात आला. वारंवार धक्क्यांमुळे त्यांच्या एका अंडकोषाचेही नुकसान झाले. तसेच, दर्शन आणि त्याच्या टोळीने केलेल्या हल्लामुळे, रेणुकास्वामीच्या छातीचे हाड तुटले. त्याच्या संपूर्ण शरीरावर एकूण ३९ जखमांच्या खुणा आहेत. पीडितच्या डोक्यावर खोलवर वारही करण्यात आले.' असे आरोपपत्रात म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.