Actor Arun Bali Passes Away Saam TV
मनोरंजन बातम्या

Actor Arun Bali Passes Away: ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actor Arun Bali Passes Away: अरुण बाली हे काही काळ मायस्थेनिया ग्रॅव्हिस या न्यूरोमस्क्युलर आजाराशी झुंज देत होते.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीतून वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्रे अरुण बाली (Arun Bali) यांचे निधन (Passed Away) झाले आहे. पहाटे साडेचार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षांचे होते आणि अनेक दिवसांपासून आजारी होते. (Bollywood Latest News)

न्यूरोमस्क्युलर आजाराशी झुंज देत होते अरुण बाली

एएनआय या वृत्तसंस्थेनेही अरुण बाली यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अरुण बाली हे काही काळ मायस्थेनिया ग्रॅव्हिस या न्यूरोमस्क्युलर आजाराशी झुंज देत होते. यानंतर त्यांना हिरानंदानी रुग्णालयातही दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

टीव्ही मालिकांची सुप्रसिद्ध नावे

अरुण बाली यांनी टीव्हीवरील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून खूप नाव कमावले. त्यांनी 'नीम का पेड़', 'दस्तूर', 'चाणक्य', 'देख भाई देख', 'द ग्रेट मराठा', 'शक्तिमान', 'स्वाभिमान', 'देस में निकला होगा चांद', 'कुमकुम- एक प्यारा सा बंधन', 'वो रहने वाली महलों की' आणि 'देवों के देव महादेव' यांसारख्या लोकप्रिय टीव्ही सीरियलमध्ये काम केले आहे.

प्रसिद्ध चित्रपटांमध्ये गाजलेल्या भूमिका

अरुण बाली हे बॉलीवुड चित्रपटांमध्ये लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी 'सौगंध', 'यलगार', 'राजू बन गया जेंटलमैन', 'खलनायक', 'राम जाने', 'पुलिसवाला गुंडा', 'सबसे बड़ा खिलाड़ी', 'सत्या', 'शिकारी', 'हे राम', 'आंखें', 'जमीन', 'अरमान', 'लगे रहो मुन्ना भाई', '3 इडियट्स', 'बर्फी', 'ओह माय गॉड', 'पीके', 'एयरलिफ्ट', 'बागी', 'केदारनाथ', 'पानीपत' और 'लाल सिंह चड्ढा' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यात कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी? जाणून घ्या एका क्लिकवर

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

SCROLL FOR NEXT