vijay krishna death  Saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; कुटुंब बुडाले शोकसागरात

vijay krishna death : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

ज्येष्ठ अभिनेते विजय कृष्णा यांचे निधन

‘देवदास’ चित्रपटात शाहरुख खान यांच्या वडिलांची भूमिका प्रचंज गाजली

‘डान्स लाइक ए मॅन’मधील विजय कृष्णा यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झालं

प्रसिद्ध अभिनेते,गोदरेज कुटुंबाच्या बिझनेसचे माजी एग्जीक्यूटिव डायरेक्टर विजय कृष्णा यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं. विजय कृष्णा यांनी 'देवदास' सिनेमात शाहरुख खान यांच्या 'ऑन स्क्रिन' वडिलांची भूमिका साकरली होती. त्यांच्या जाण्याने त्यांचं कुटुंब आणि चाहते शोकसागरात बुडालंय. विजय कृष्णा यांच्या निधनाने पत्नी स्मिता कृष्णा आणि मुलगी नायरिका होळकर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

विजय कृष्णा यांनी २५ वर्षांहून अधिक काळ अभिनय केला. 'डान्स लाइक ए मॅन' या सिनेमात त्यांनी केलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होतं. हा सिनेमा पामेला रुक्स यांनी दिग्दर्शित केला होता. 'डान्स लाइक ए मॅन' हा सिनेमा महेश दत्तानी यांच्या नाटकावर आधारित होता. या सिनेमातून शोभना, आरिफ जकारिया, अनुष्का शंकर यांनी डेब्यू केला.

बॉलिवूडमध्ये विजय कृष्णा यांना संजय लीला भन्साली यांच्या २००२ साली प्रदर्शित झालेल्या 'देवदास' सिनेमात शाहरुख खानचे वडील नारायण यांची भूमिका केली होती. या सिनेमात ऐश्वर्या रॉय, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ आणि किरण खेर हे कलाकार देखील होते. मात्र, त्यांनी केलेली भूमिका जास्त चर्चेत राहिली. विजय कृष्णा यांच्या निधनावर कलाकार लिलेट दुबे यांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT