aman jaiswal  Saam tv
मनोरंजन बातम्या

Aman Jaiswal Death : शुटिंगसाठी जाताना काळाचा घाला; २३ वर्षीय अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, मनोरंजन सृष्टीवर शोककळा

Aman Jaiswal Death update : 23 वर्षीय अभिनेता अमन जायसवाल याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जोगेश्वरी येथील महमार्गावर अपघाती मृत्यू झाला. अमनच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Vishal Gangurde

टीव्ही मालिका 'धरतीपुत्र नंदिनी' फेम अभिनेता अमन जायसवालचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून शुटिंगसाठी जाताना अपघातात काळाने घाला घातल्याची घटना घडली. मुंबईच्या जोगेश्वरी येथील महामार्गावर ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर २५-३० मिनिटांत त्याचा मृत्यू झाला आहे. अमनच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अमन जायसवाल हा मूळचा उत्तर प्रदेशच्या बलिया येथील होता. अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला होता. त्याने मोठ्या मेहनतीने अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. मात्र, वयाच्या २३ व्या वर्षी त्याचा रस्ता अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे.

अमनने अवघ्या २३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याने २०२३ साली टीव्ही चॅनल 'धरतीपुत्र नंदिनी' शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. या शोमध्ये त्याला मुख्य भूमिका मिळाली होती. याआधी त्याने 'उडारिया' आणि 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' या टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ऑडिशनसाठी शुटिंगला जाताना त्याचा अपघाती मृत्यू झाला.

अभिनेत्रीने दिली 'धरतीपुत्र नंदिनी' मालिकेत एन्ट्री

'उडारिया'मध्ये काम करण्यासाठी अमन जायसवाल हा काही काळासाठी पंजाबच्या चंडीगडमध्ये राहिला होता. अमन त्याच शोनंतर मुंबईत परतरला होता. त्याची नवनव्या भूमिका साकारण्याची इच्छा होती. त्याला मालिकेत प्रमुख भूमिका देखील मिळाली आहे. त्याला मनोरंजन सृष्टीत काम करण्याची संधी एका अभिनेत्रीने दिली. प्रसिद्ध मालिका 'रामायण' या मालिकेतील 'सीता'ची भूमिका निभावणारी अभिनेत्री दीपिका चिखलियाने संधी दिली होती. ती 'धरतीपुत्र नंदिनी' शोची निर्माती होती.

आईला द्यायचा यशाचं श्रेय

अमनला लहानपणापासून अभिनेता होण्याची इच्छा होती. त्याच्या वडिलांची इच्छा होती की, 'आईएएस ऑफिसर, इंजिनीअर किंवा डॉक्टर व्हावे, असे वाटायचे. त्याचा वडिलांना वाटायचं की, त्याने अभिनेता होऊ नये. मात्र, अमनला त्याच्या आईने साथ दिली. अमनच्या आईने त्याच्या वडिलांची समजूत काढली. अमन नेहमी त्याच्या यशाचं श्रेय त्याच्या आईला द्यायचं. दरम्यान, आता अमन हा कायमचा जग सोडून गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT