Bade Miyan Chote Miyan Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

BMCM Day 6 Collection: अक्षय कुमारच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; जगभरामध्ये कमाई जोमात

BMCM Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर देशासह परदेशात अक्षय कुमारच्या आणि टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाची जोरदार कमाई सुरू आहे.

Chetan Bodke

Bade Miyan Chote Miyan Day 6 Box Office Collection

सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या आणि टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाची जोरदार कमाई सुरू आहे. चित्रपटाची देशासह परदेशातही जोरदार कमाई सुरू आहे. चित्रपटाला पहिल्या विकेंडला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतरत्र दिवशीही उत्तम कमाई करत असल्याचं दिसत आहे. नुकतंच सहाव्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आलेला आहे. चित्रपटाने देशभरामध्ये सहा दिवसांतच ४६ कोटींच्या आसपासची कमाई केली आहे. (Bollywood)

सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २०२४ मध्ये जगभरामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. अक्षय आणि टायगरच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.६५ कोटी, दुसऱ्या दिवशी ७ कोटी, तिसऱ्या दिवशी ८.५ कोटी, चौथ्या दिवशी ९.५ कोटी, पाचव्या दिवशी २.५ कोटी तर सहाव्या दिवशी चित्रपटाने २.२५ कोटींची कमाई देशभरामध्ये केलेली आहे. तर जगभरामध्ये चित्रपटाने सहा दिवसांत १३५ कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. चित्रपटाने फार कमी दिवसात दमदार कमाई केल्यामुळे प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Bollywood Film)

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता होती. ॲक्शन सीन्सपासून ते मनोरंजक  सस्पेन्स आणि थ्रिलरपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवणारा आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाचं तब्बल ३५० कोटींचं बजेट आहे. चित्रपटाने प्रदर्शनाआधी पासूनच जोरदार कमाई सुरू केली आहे. (Bollywood News)

चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, आलिया एफ आणि मानुषी छिल्लरशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT