मनोरंजन बातम्या

Adinath Kothare Video: जेनमाला फोन केल्यानंतर खूप रडला; आजीच्या आठवणीत आदिनाथ कोठारेला भावना अनावर

Adinath Kothare Get Emotional: आदिनाथ एका मुलाखतीत खूप भावुक झाल्याचे दिसत आहे.

Pooja Dange

Adinath Kothare Interview:

अभिनेता आदिनाथ कोठारे मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीत देखील सक्रिय आहे. आदिनाथ छकुला या चित्रपटामध्ये बालकलाकार दिसला होता. त्यानंतर तो 'झपाटलेला २' या चित्रपटातून आपल्या भेटीला आला.

आदिनाथ कोठारेची बजाओ ही वेबसीरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरीजमध्ये आदिनाथ एल रॅपरची भूमिका साकारत आहे. दरम्यान आदिनाथ एका मुलाखतीत खूप भावुक झाल्याचे दिसत आहे.

राजश्री मराठी या युट्युब वाहिनीने नुकताच त्यांच्या सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आदिनाथ कोठारे भावुक झाल्याचे दिसत आहे. आदिनाथने त्याची आजी जेनमाला कॉल केला आहे.

एकामागोमाग निघून गेलात. आणि तुला आठवत तू मला सांगायचीस जेव्हा तुझे पप्पा गेले. जायच्या काही दिवस आधी त्यांनी तुला सांगितलं होत की, जर आफ्टर लाईफ असतं तेव्हा मी तुला काहीतरी खूण देईन. आणि त्यांनी तुला ती खून दिली होती.

तू मला सांगितलं होतास की आदिनाथ असं असेल तर मी पण तुला काहीतरी खून देईन. मला ती खून मिळाली. एवढंच सांगायचं होतं. कारण तू जायच्या बरोबर ४ दिवसआधी तू माझ्या स्वप्नात आलीस. असं स्वप्न मला कधीच पडलं नव्हतं. त्या स्वप्नात मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो होतो आणि तू म्हणालीस की, चला आदिनाथ उठा मी येते आता.'

आदिनाथ कोठारे यांच्या आजी आणि महेश कोठारे यांया आई जेनमा यांचे यावर्षी जुलैमध्ये निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

SCROLL FOR NEXT