HBD Atul Kulkarni: अभिनेता, लेखक आणि बरंच काही.. खऱ्या अर्थाने चतुरस्त्र कलाकार म्हणजे अतुल कुलकर्णी

Atul Kulkarni Birthday Special: अभिनेता अतुल कुलकर्णी यांचा १० सप्टेंबरला वाढदिवस आहे.
Atul Kulkarni
Atul KulkarniSaam Tv

Happy Birthday Atul Kulkarni:

अभिनेता अतुल कुलकर्णी यांचा १० सप्टेंबरला वाढदिवस आहे. अतुल कुलकर्णीचा जन्म १९६५ साली कर्नाटक येथे झाला. अतुल कुलकर्णी यांनी अनेक अप्रतिम चित्रपटांमध्ये काम केले आहे. अतुल कुलकर्णी यांनी मराठी व्यतिरिक्त हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अतुल कुलकर्णी यांच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्यांच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी.

Atul Kulkarni
Hemangi Kavi Post: 'रजनीकांत माझे आदर्श...', 'जेलर' पाहिल्यानंतर अभिनेत्री हेमांगी कवीची खास पोस्ट

अतुल कुलकर्णी यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कर्नाटकातून केले. दहावीत असताना त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी १९९५साली नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून डिप्लोमा केला. त्यानंतर त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. ११९७ साली अतुल कुलकर्णी यांनी १९९७ साली 'भूमी गीता' चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर अतुल २००० साली 'हे राम' चित्रपटामध्ये दिसले.

याच दरम्यान अतुल कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीत देखील सक्रिय झाले त्यांनी २००० कैरी या मराठी चित्रपटामध्ये काम केले. १०वी फ - २००३, वळू - २००८, नटरंग - २०१०, प्रेमाची गोष्ट - २०१३, हॅपी जर्नी - २०१४ हे त्यांचे मराठीतील गाजलेले चित्रपट आहेत.

Atul Kulkarni
Welcome 3 Teaser: अक्षय कुमारने स्वतःसह चाहत्यांना दिले खास गिफ्ट; 'वेलकम 3'चा टीझर केला शेअर

दुसरीकडे अतुल कुलकर्णी हिंदी सिनेसृष्टीत देखील सक्रिय झाले. २००१ साली आलेल्या मधुर भंडारकर यांच्या 'चांदनी बार' चित्रपटामध्ये ते दिसले. या चित्रपटातून त्यांची ख्याती देशभरात पोहोचली. अतुल कुलकर्णी यांनी रंग दे बसंती, पेज ३, द अटॅक्स ऑफ २६/११, दिल्ली ६, द गाझी अटॅक, अ थर्सडे या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अतुल कुलकरी यांना नटरंग चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर चांदनी बारसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे.

चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अतुल कुलकर्णी यांनी 2018 मध्ये 'द टेस्ट केस' द्वारे OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. यानंतर ते 'सिटी ऑफ ड्रीम्स', 'बंदिश डाकू', 'रुद्र: द इज ऑफ डार्कनेस'सह अनेक वेबसीरीजमध्ये दिसले.

पटकथा लेखक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत होता. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

अतुल कुलकर्णीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी गीतांजली कुलकर्णीशी लग्न केले आहे. त्यांची पत्नी गीतांजली कुलकर्णी देखील एक थिएटर आर्टिस्ट असून 'गुल्लक' वेबसीरीजमध्ये दिसली होती. तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

अभिनयासोबतच गीतांजली आणि अतुल लहान मुलांसाठी एक NGO चालवतात. या एनजीओचे नाव क्वेस्ट एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट आहे. या संस्थेद्वारे 14 वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com