Abhishek Bachchan Criticises Bollywood Actors Saam Tv
मनोरंजन बातम्या

Abhishek Bachchan Trolls Young Actors: सिक्स ॲब्स बनवणाऱ्या अभिनेत्यांना अभिषेक बच्चनने सुनावलं; म्हणाला, ‘फिटनेसपेक्षा...’

Abhishek Bachchan Interview: अभिषेक बच्चनने नुकतीच ‘घुमर’ चित्रपटानिमित्त एका वेबसाईटला मुलाखत दिली आहे, त्या मुलाखतीत त्याने नवोदित कलाकारांना मोलाचा सल्ला दिला आहे.

Chetan Bodke

Abhishek Bachchan Criticises Bollywood Actors: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन नेहमीच आपल्या अभिनयासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सध्या अभिषेक ‘घुमर’ चित्रपटाच्या माध्यमातून चर्चेत आला आहे. अभिषेक बच्चन नेहमी आपल्या अभिनयाने नाही तर, त्याच्या रोखठोक विधानांमुळे तो कायमच चर्चेत असतो. यावेळी देखील अभिषेक एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. नुकताच त्याने नवख्या कलाकारांना काही मोलाचा सल्ला दिला आहे. सध्या अभिनेत्याने दिलेला हा सल्ला कमालीचा चर्चेत आला आहे.

अभिषेकने आतापर्यंत काही वेब सीरिज आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. अभिषेकने नुकतीच ‘घुमर’ चित्रपटानिमित्त ‘दैनिक भास्कर’ या वेबसाईटला एक मुलाखत दिली आहे. यावेळी अभिषेक बच्चनला ‘जर तुला कधी चित्रपटासाठी ॲब्स बनवण्याची संधी मिळाली तर, तू बनवशील का?’ या प्रश्नावर अभिषेकने उत्तर दिले की, “माझ्या ओळखीचे एक पोलिस होते. त्यांची उत्तम शरीरयष्टी होती. पण ते प्रत्येकाला आपले सिक्स ॲब्स दाखवतील असे नव्हते.”

आपल्या मुलाखतीत पुढे अभिषेक बच्चन म्हणतो, “ज्यावेळी मी अनेकांमध्ये सिक्स पॅक अ‍ॅब्सबद्दलची क्रेझ दिसते, त्यावेळी मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं. आता तुम्ही आमिरचंच उदाहरण घ्या ना, तो ‘धूम ३’ मध्ये किती फिट दिसत होता आणि ‘दंगल’मध्ये पाहा किती लठ्ठ दिसत होता. सध्याच्या अनेक तरुण कलाकारांना सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवून अभिनेता होण्याची खूपच आवड आहे. पण अभिनेता हा फक्त सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवून होता येत नाही तर, त्यासाठी आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवा आणि आपल्या अभिनय कौशल्यावर काम करा. उत्तम अभिनेता होण्यासाठी तुम्हाला फक्त बॉडी बनवून चालत नाही.”

अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, लवकरच तो आर बाल्कि दिग्दर्शित ‘घूमर’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटात सैयामी खेरदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. येत्या १८ ऑगस्टपासून हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

Maharashtra FDA: राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, ८८ जणांवर मोठी कारवाई

Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

Ayodhya Blast News : सिलिंडरच्या स्फोटानंतर घर कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, श्रीरामांच्या नगरीत खळबळ

SCROLL FOR NEXT