Abir Gulaal  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Abir Gulaal Release: दिलजीत दोसांझचे नियम फॉलो करतोय फवाद खान; अबीर गुलाल 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Abir Gulaal Release: पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला त्याच्या 'अबीर गुलाल' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच मोठा धक्का बसला होता. पण, आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Shruti Vilas Kadam

Abir Gulaal Release: 'अबीर गुलाल' या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. यात बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर आणि तिच्यासोबत पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आहे. एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले. त्यामुळेच भारतीयांना चित्रपटात पाकिस्तानी कलाकारांच्या उपस्थितीने राग आला होता. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. पण अखेर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'बिझ एशिया'च्या वृत्तानुसार, 'अबीर गुलाल' २९ ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. परंतु भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणि देशातील पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असल्याने हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. यापूर्वी दिलजीत दोसांझच्या 'सरदारजी ३' चित्रपटावरून वाद झाला होता. त्यात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर होती. निर्मात्यांनी हा चित्रपट भारतात प्रदर्शित न करता जगभरात प्रदर्शित केला. ही कल्पना वापरुन आता 'अबीर गुलाल' हा चित्रपट जगभर प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित होणार होता

'अबीर गुलाल' हा चित्रपट ९ मे २०२५ रोजी भारतात प्रदर्शित होणार होता. पण त्याआधी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. आणि त्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' केला. त्यानंतर देशात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली. भारतीय चित्रपट संघटनांनी कडक घोषणा केली की जर कोणताही कलाकार शेजारच्या देशातील कलाकारांना चित्रपटात घेतले तर तो चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही.

भारतात प्रदर्शित होणार नाही

या सर्व कारणांमुळे 'अबीर गुलाल' भारतात कधीही प्रदर्शित होणार नाही. परंतु निर्मात्यांनी तो जगभरात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाद्वारे फवाद सुमारे ९ वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार होता. याआधी तो सोनम कपूरसोबत 'खूबसूरत' आणि आलिया भट्टसोबत 'कपूर अँड सन्स' मध्ये दिसला आहे. 'ऐ दिल है मुश्किल' मध्येही त्याची भूमिका होती. म्हणूनच चाहते फवादच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते, पण पहलगाम हल्ल्याने भावना बदलल्या आणि भारतीयांनी चित्रपटावर बहिष्कार टाकला.

Manoj jarange patil protest live updates: ५८ लाख नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायतमध्ये लावण्याच्या मागणीला मान्यता- मनोज जरांगे पाटील

Bigg Boss 19: तान्या मित्तल नाही तर, 'हा' आहे प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक; 'बिग बॉस १९'च्या वोटिंगमध्ये कोणी मारली बाजी?

Police Fullform: पोलिस या शब्दाचा अर्थ काय?

Malvan Tourism : मालवणजवळील Top 5 स्पॉट्स; समुद्रकिनारे, किल्ले आणि आकर्षणे

Maratha Reservation: या ताटातलं काढून त्या ताटात द्या हे... चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT