Abhishek Bachchan React To Rumours Of Divorce From Aishwarya Rai Instagram
मनोरंजन बातम्या

Abhishek Bachchan: ऐश्वर्या रायसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चन पहिल्यांदाच बोलला, अभिनेत्याने अखेर सांगितलं सत्य

Abhishek Bachchan React To Rumours Of Divorce From Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. खुद्द अभिषेकने घटस्फोटाच्या चर्चांना पुर्णविराम दिलेला आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्याशिवाय ते 'ग्रे घटस्फोट' अशी ही चर्चा झाली होती. यासर्व चर्चांदरम्यान बच्चन कुटुंबीयांनी भाष्य केले नव्हते. पण आता या चर्चांदरम्यान खुद्द अभिषेक बच्चनने प्रतिक्रिया दिलेली आहे. खुद्द अभिनेत्यानेच घटस्फोटाच्या चर्चांना पुर्णविराम दिलेला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक बच्चनने बॉलिवूड यूके मीडियाला दिलेल्या मुलाखतीत, त्याने स्वत: अंगठी अंगठी दाखवत सांगितले की "आम्ही अजूनही एकमेकांसोबत आहोत. आमच्या घटस्फोटाच्या चर्चा विनाकारण माध्यमांमध्ये केल्या जात आहे. मला याविषयी काहीही बोलायचे नाही. या सर्व गोष्टी प्रमाणाबाहेर विचित्र पद्धतीने सांगितल्या जात असल्यामुळे हे खूप वाईट आहे. तुम्ही हे का करत आहेत ? हे सुद्धा मला कळतंय. तुम्हालाही बातम्या कराव्या लागतात, पण ठिक आहे. त्यातल्या त्यात आम्ही सेलिब्रिटी आहोत, तर आम्हाला यासर्व गोष्टींना सामोरं जावं लागतंच."

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अभिषेक बच्चनचा एक डिपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या डिपफेक व्हिडिओत अभिषेक बच्चन, "या जुलै महिन्यात मी आणि ऐश्वर्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असं म्हणताना तो दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिषेकने एक डिव्होर्सबद्दलची इन्स्टा पोस्ट लाईक केली होती. तेव्हाही त्यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा झाली होती.

अनंत अंबानीच्या लग्नात अभिषेक बच्चन, जया बच्चन, अमिताभ बच्चन, श्वेता नंदा एकत्र आले होते, तर ऐश्वर्या आणि तिची मुलगी वेगळी आली होती. तेव्हापासूनच या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुरूवात झाली होती. २००७ मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांचे थाटामाटामध्ये विवाहसोहळा पार पडला. यानंतर २०११ मध्ये या जोडप्याने लेक आराध्याला जन्म दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT