Bachchan Family  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bachchan Family : ऐश्वर्या कुठे आहे? बच्चन कुटुंबीयांना एकत्र पाहून नेटकऱ्यांचा सवाल

Bachchan Family Spotted Without Aishwarya : अभिषेक बच्चन, जया बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन काल रात्री मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले. तेव्हा नेटिझन्सना एक प्रश्न विचारला की, ऐश्वर्या राय कुठे आहे?

Shreya Maskar

सध्या अभिषेक बच्चन ( Abhishek Bachchan ) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या घटस्फोटाच्या अफवा काही काळापासून चर्चेत आहेत. अशात अभिषेक बच्चन, जया बच्चन (Jaya Bachchan) आणि बहीण श्वेता बच्चन ( Shweta Bachchan) मंगळवारी रात्री मुंबई विमानतळावर (Airport )स्पॉट झाले. तिघेही विमानतळावरून बाहेर पडताना दिसले. तेव्हा एका नेटिझन्सना त्यांना प्रश्न विचारला की, ऐश्वर्या राय कुठे आहे?

बच्चन कुटुंब विमानतळावरून बाहेर पडतानाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर सर्वत्र पाहायला मिळत आहे. एका यूजरने व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिले की, 'ऐश्वर्या त्यांच्यासोबत नाही. ती कुठे आहे?' आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे, 'ऐश्वर्या आणि आराध्याशिवाय बच्चन कुटुंब अपूर्ण आहे.' तर एका यूजरने विचारले, 'ऐश्वर्या त्यांच्यासोबत का नाही?' अशा असंख्य कमेंट्स तुम्हाला या व्हिडिओवर पाहायला मिळतील.

अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवा

गेल्या अनेक महिन्यांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात अंबानींच्या लग्नासाठी अभिषेक आणि ऐश्वर्या वेगवेगळे आले होते. तसेच ते आता सहसा कुठे एकत्र स्पॉट होत नाही. ऐश्वर्या नेहमी मुलगी आराध्यसोबत स्पॉट होते. यामुळे अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यामध्ये काहीतरी बिघडले आहे. असा अंदाज लावला गेला. एका मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेकला घटस्फोटाबद्दल विचारल्यावर त्यांनी 'मी अजून विवाहित आहे असे म्हणून लग्नाची अंगठी दाखवली.'

ऐश्वर्या-अभिषेकच्या लव्हस्टोरी

अभिषेक आणि ऐश्वर्याने 2000 मध्ये 'ढाई अक्षर प्रेम के' आणि नंतर 2006 मध्ये 'उमराव जान'मध्ये एकत्र काम केले, जिथे ते चांगले मित्र बनले. अभिषेकने एका शोमध्ये खुलासा केला की, न्यूयॉर्कमध्ये चित्रीकरण करत असताना, तो त्याच्या हॉटेलच्या बाल्कनीत उभा राहायचा आणि त्याला ऐश्वर्याशी लग्न करण्याची इच्छा होती. काही वर्षांनंतर, त्याच हॉटेलमध्ये त्यांच्या 2007 मध्ये 'गुरू' या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी, त्याने तिला प्रपोज केले. त्याच वर्षी ऐश्वर्या-अभिषेक लग्नबंधनात अडकले. 2011 मध्ये त्यांच्या आयुष्यात आराध्या आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Maharashtra Live News Update: विना परवाना गावठी कट्टा आणि पोलिस गणवेश बाळगणाऱ्यास अटक

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

SCROLL FOR NEXT