Abhishek Bachchan Instagram @bachchan
मनोरंजन बातम्या

Abhishek Bachchan Awards: अभिनेता म्हणून भले अपयशी, पण पुरस्कार आणि पैसा कमावण्यात हुशार आहे ज्युनियर बच्चन

अभिषेक बच्चनच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही आहे.

Pooja Dange

Abhishek Bachchan's Record and Award: अभिनेता अभिषेक बच्चनचा आज 47 वा वाढदिवस आहे. अभिषेक बच्चनने 2000 मध्ये 'रिफ्युजी' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचा हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. पहिल्या फ्लॉप चित्रपटानंतरही अभिषेकने हिंमत हारली नाही आणि जे चित्रपट मिळाले ते करत राहिला.

अभिषेक बच्चन हा मेगास्टारचा मुलगा असला तरी पदार्पणापूर्वी त्याला अनेक नकारांना सामोरे जावे लागले होते. जवळजवळ प्रत्येक चित्रपट निर्मात्याने त्याला नाकारले. पण 'पा', 'दासवी', 'बंटी और बबली', 'ब्लफमास्टर', 'धूम' आणि 'गुरु' या चित्रपटांनी अभिषेक बच्चनच्या करिअरला कलाटणी दिली.

अभिषेक बच्चननेही 'गुरु', 'पा', 'युवा', 'सरकार' आणि 'रावण' यांसारख्या चित्रपटांतून आपली अभिनय प्रतिभा दाखवली. या चित्रपटांसाठी अभिषेक बच्चनला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. अभिनयासाठी सलग तीन फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारा अभिषेक बच्चन हा दिलीप कुमारनंतरचा दुसरा अभिनेता आहे.

अभिषेक बच्चनच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही आहे. अभिषेक बच्चन आणि त्याचे वडील अमिताभ बच्चन यांची नावे चित्रपटाच्या पडद्यावर विरुद्ध भूमिका साकारण्यासाठी गिनीज बुकमध्ये नोंदली गेली आहेत. खरंतर 'पा' मध्ये अभिषेकने त्याचे खऱ्या आयुष्यातील वडील अमिताभ यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तसेच या चित्रपटात अमिताभ अभिषेकच्या मुलाच्या भूमिकेत होते. बॉलीवूडमध्ये किंवा साऊथ सिनेमात असं कधी घडलं नाही.

अभिषेक बच्चनच्या नावावर आणखी एक गिनीज रेकॉर्ड आहे. तो त्याच्या 'दिल्ली 6' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिषेक 12 तासांत अनेक शहरांमध्ये पब्लिकली दिसला होता. यासाठी अभिषेकचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

अभिषेक बच्चनकडे करोडोची संपत्ती आणि महागड्या कारचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे अनेक आलिशान कार आहेत. 'सीए नॉलेज'च्या रिपोर्टनुसार, 2022 मध्ये अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती 203 कोटी रुपये होती. अभिषेक सध्या फारसे चित्रपट करत नसला तरी याचा त्याच्या कमाईवर फारसा परिणाम झालेला नाही.

अभिषेकला चित्रपटांपेक्षा खेळात जास्त रस आहे. अभिषेक बच्चन हा अभिनेता पेक्षा चांगला बिझनेसमन आहे. त्याच्याकडे सध्या दोन यशस्वी क्रीडा संघ आहेत. यापैकी एक संघ प्रो कबड्डीमध्ये आहे, ज्याचे नाव 'पिंक पँथर्स जयपूर' असे आहे आणि दुसरा फुटबॉल संघ 'चेन्नईयिन एफसी' आहे. या संघाने इंडियन सुपर लीग देखील दोनदा जिंकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Liver disease: एड्सपेक्षाही धोकादायक आहे 'हा'लिव्हरचा आजार; 'साइलेंट किलर' समस्येची लक्षणंही वेळीच जाणून घ्या

Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीत

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT